गर्भवती असल्याची कल्पनाच नव्हती, 47 व्या वर्षी दिला बाळाला जन्म

सोनम (काल्पनिक नाव) लग्नानंतर काही दिवसांनी गर्भवती राहिली. पण, पाच महिन्यांचा गर्भ पोटात असताना गर्भपात झाला. तेव्हापासून तिने आपल्याला मुल केव्हा होईल, यासाठी स्वप्न बघीतले. पण, त्यात ती यशस्वी होऊ शकली नव्हती. त्यानंतर आता आपल्याला मुल होईल, ही अपेक्षाच तिने सोडून दिली होती. परंतु, आता डिलिव्हरी झाल्यानंतर मुल आणि त्याची आई सुस्थितीत आहेत. बाळ तीन किलो वजनाचे आहे.

गर्भवती असल्याची कल्पनाच नव्हती, 47 व्या वर्षी दिला बाळाला जन्म
रुग्णावर उपचार करणारी एम्समधील डॉक्टरांची चमू.
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 12:19 PM

नागपूर : लग्न होऊन 17 वर्षे झाली. पण, मुलबाळ काहीच होत नव्हते. त्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण, यश आले नाही. दरम्यान, महिलेची चार वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाली. अचानक आठ महिने झाल्यानंतर पोट दुखू लागले. रुग्णालयात गेल्यानंतर कळले की, गर्भवती आहे तेही वयाच्या सत्ताचाळीसाव्या वर्षी. एम्समध्ये ही अनोखी डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत.

सोनम (काल्पनिक नाव) लग्नानंतर काही दिवसांनी गर्भवती राहिली. पण, पाच महिन्यांचा गर्भ पोटात असताना गर्भपात झाला. तेव्हापासून तिने आपल्याला मुल केव्हा होईल, यासाठी स्वप्न बघीतले. पण, त्यात ती यशस्वी होऊ शकली नव्हती. त्यानंतर आता आपल्याला मुल होईल, ही अपेक्षाच तिने सोडून दिली होती. परंतु, आता डिलिव्हरी झाल्यानंतर मुल आणि त्याची आई सुस्थितीत आहेत. बाळ तीन किलो वजनाचे आहे.

मधुमेह, रक्तदाबाचा होता त्रास

सोनमला उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. पोटात दुखते म्हणून ती डॉक्टरांकडे गेली. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला आठ महिन्यांची गरोदर असल्याचं सांगितलं. तेव्हा तिला धक्काच बसला. ती गरोदर असल्याचं कळताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. एम्सच्या डॉ. सुचिता मुंडले, डॉ. अनिता यादव, डॉ. नेहा गंगणे, डॉ. गुंजन घोडेश्वर यांच्या निगराणीखाली तिला ठेवण्यात आले.

बाळ आणि आई सुखरूप

उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्यानं बाळावर त्याचा काही दुष्परिमाण होऊ शकत होता. त्यामुळे तिची विशेष काळजी घेतली गेल्याचं डॉ. निशांत बानाईत यांनी सांगितलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला आईकडूनच स्तनपान करविले गेले. रुग्णाला भूल देणं आव्हानात्मक होत, असं डॉ. अविनाश प्रकाश यांनी सांगितलं. टिमवर्कमुळं ही केस योग्य पद्धतीनं हाताळली गेल्याचं डॉ. विभा दत्ता यांनी सांगितलं. एम्स रुग्णालय प्रसूतीसाठी योग्य सुविधा पुरवित असल्याचं डॉक्टर म्हणाले.

डॉक्टरांचे मानले आभार

आई होणं हे प्रत्येक महिलेचं लग्नानंतरचे स्वप्न असते. ते स्वप्न आता पूर्ण होणार नाही, असं सोनमला वाटत होतं. ती आणि तिचे पती यांनी आपल्याला आता मुलं होईल, ही अपेक्षाच सोडून दिली होती. पण, अचानक झालेल्या प्रसूतीने दोघेही सुखावले गेले. त्यांनी एम्सच्या डॉक्टरांचे आभार मानले.

ज्या जजनं अनिल देशमुखांचं घरचं जेवण बंद केलं, त्यांची थेट यवतमाळला बदली

१५ वर्षीय मुलाला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर, 107 दिवस होता व्हेंटिलेटरवर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.