VIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी नावाचा गावगुंड अखेर प्रकटला आहे. टीव्ही9 मराठीशी या कथित मोदीने संवादही साधला आहे.

VIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला
umesh gharde
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 1:35 PM

नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी नावाचा गावगुंड अखेर प्रकटला आहे. टीव्ही9 मराठीशी या कथित मोदीने संवादही साधला आहे. माझी पत्नी सोडून गेली. म्हणून गावातले लोक मला मोदी म्हणतात. मी दारुचा व्यवसाय करतो. मी गावगुंड आहे, असं या व्यक्तीने म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद थांबणार का? असा सवाल केला जात आहे.

उमेश घरडे असं या व्यक्तीचं नाव आहे. मीडियासमोर येऊन घरडे याने आपणच गावगुंड असून आपल्याला लोक मोदी संबोधत असल्याचं म्हटलं आहे. माझी पत्नी सोडून गेली म्हणून मला गावातले लोक मोदी बोलतात. मी दारुचा व्यवसाय करतो, गावगुंड आहे, आपण कुणाला घाबरत नाही, असं घरडे याने म्हटलं आहे. या मोदीचं मूळ नाव उमेश घरडे ऊर्फ मोदी असं आहे. आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असंही त्याने सांगितलं.

नशेत काय बोलतो ते कळत नाही

हुमणे नावाच्या व्यक्तीला नशेत शिवीगाळ केली. नशेत काय बोलतो हे मला काही कळत नाही. नशा उतरल्यावर मी हुमणे व्यक्तीला भेटलो आणि त्यांची माफी मागितली. नाना पटोले यांना भेटून माफी मागू शकलो नाही. त्यामुळे मी पोलीस ठाण्यात गेलो होतो, असं घरडे याने सांगितलं. ते मला शिव्या देऊ शकतात तर मीही त्यांना शिव्या देऊ शकतो. पटोले काय मोठे नेते आहेत का? असा सवाल त्यांनी केला. माझ्यावर अवैध दारू विक्री करत असल्याचे गुन्हे आहेत, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे.

मोदी म्हणून ओळख, एकही गुन्हा नाही

भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार संपल्यानंतर नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे संपूर्ण देशभर याचे पडसाद उमटेल असून वेगवेगळ्या स्तरावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. नंतर नाना पटोलेंनी यूटर्न घेत मी देशाच्या पंतप्रधानांविषयी बोललॊ नाही तर मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोललो असल्याचा दावा केला होता. त्याची चौकशी पोलीस करीत असून पोलिसांनी टोपण नाव असलेल्या मोदीची विचारपूस केली आहे. लाखनी तालुक्यातही उमेश प्रेमचंद घरडे या व्यक्तीला मोदी या नावाने ओळखले जाते. याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी व संपूर्ण परिवार नागपूर येथे राहतो. उमेश दोन वर्षांपासून गावातच एकटाच राहतो. दारू पिऊन गावकऱ्यांना शिवीगाळ करतो. मात्र त्याच्या विरुद्ध पोलिसात अजूनही कुठलीही तक्रार दाखल नाही. तो गावगुंड नाही, पालांदूर पोलिसांनी उमेश घरडे यांची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे.

नार्को टेस्ट करा

दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेश घरडे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. हे खोटं आहे, आम्ही नाना पटोले यांना सोडणार नाही. न्यायालयात जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी नाना पटोले संघटना तयार करत आहेत. हा राजकीय तमाशा काँग्रेसने सुरु केला, तो नाना पटोले यांनी संपवावा, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

पुण्यात कोविडमुक्त गाव अभियान राबवणार, ग्रामपंचायतींना मिळणार 50 लाखाचे बक्षीस: अजित पवार

Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी !

Gorakhpur Murder | न्यायालयाच्या आवारातच आरोपीची हत्या, बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांनी झाडल्या गोळ्या

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.