साईच्या जागेवरील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करणार, नितीन गडकरी व अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक

शहरातील वाठोडा परिसरात 84 एकर जागेत स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) प्रस्तावित आहे. काही जणांनी अतिक्रमण केल्यामुळं साईचे काम रखडले होते. अतिक्रमणधारकांचे सात एकर जागेमध्ये जवळच पुनर्वसन करण्यात येणार आहे.

साईच्या जागेवरील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करणार, नितीन गडकरी व अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक
Sai
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 9:28 AM

नागपूर : शहरातील वाठोडा परिसरात 84 एकर जागेत स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) प्रस्तावित आहे. काही जणांनी अतिक्रमण केल्यामुळं साईचे काम रखडले होते. अतिक्रमणधारकांचे सात एकर जागेमध्ये जवळच पुनर्वसन करण्यात येणार आहे. दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

साईसाठी मनपाने दिली होती 140 एकर जागा

महापालिकेने 140 एकर जागा साईला सुपूर्त केली. याला राज्य सरकारनेदेखील मंजुरी दिली आहे. परंतु, यापैकी 60 एकर जागेवर स्थानिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रिकाम्या असलेल्या वाठोडा आणि तरोडी येथील 87 एकर जागेवरच साई उभारण्यात येणार आहे. त्यापैकी फक्त सात एकर जागेवरील नागरिकांचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. त्यांना दुसरीकडे जवळच जागा देण्यात येणार आहे.

खेलो इंडियाचे केंद्र सुरू करण्याची मागणी

खेलो इंडियाचे केंद्र नागपुरात सुरू करावे, अशी मागणी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय क्रीडामंत्री ठाकूर यांना दिल्लीमध्ये केली. क्रीडामंत्री ठाकूर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती महापौर तिवारी यांनी दिली. निवेदनाची प्रतिलीपी ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविली. नागपूरने देशाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले आहेत.

क्रीडा साहित्य, प्रशिक्षण मिळावे

नागपुरात महापालिका दरवर्षी खेलो नागपूर खेलो, खासदार क्रीडा महोत्सव, आयोजित करते. यात शहरातील वेगवेगळ्या खेळातील खेळाडू भाग घेतात. शहरात कबड्डी, बास्केटबॉल, खो-खो, बॉक्सिंग, टेबल टेनिस, पॅरालिम्पिक, वेटलिफ्टिंग, स्विमिंग, अॅथलेटिक्स, व्हॉलिबॉल, सॉफ्टबॉल आदी क्रीडा प्रकारात प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यामुळे क्रीडांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी केंद्रीय क्रीडामंत्री ठाकूर यांना महापौर तिवारी यांनी केली.

इतर बातम्या :

VIDEO: विरोधकांची एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी, संप चिघळवण्याचा डाव; वडेट्टीवार म्हणतात, मधला मार्ग काढू

नागपुरातील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून होणार?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.