Sanjay Raut on BJP, Navneet Rana: आय रिपीट… राष्ट्रपती राजवट लावाच; राऊत फडणवीसांना म्हणाले, तुम्हाला का मिरच्या झोंबतात?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला आहे.

Sanjay Raut on BJP, Navneet Rana: आय रिपीट... राष्ट्रपती राजवट लावाच; राऊत फडणवीसांना म्हणाले, तुम्हाला का मिरच्या झोंबतात?
आय रिपीट... राष्ट्रपती राजवट लावाच; राऊत फडणवीसांना म्हणाले, तुम्हाला का मिरच्या झोंबतात?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 12:23 PM

नागपूर: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक खवळले असून त्यांनी मातोश्रीबाहेर घेराबंदी केली आहे. त्यामुळे वांद्रे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी नवनीत राणा आणि भाजपवर (bjp) टीका केली आहे. आम्हाला राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका. आय रिपीट. पुन्हा सांगतो. राष्ट्रपती राजवट लावाच. आताच माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. बायकांच्या आडून भाजप जे शिखंडीचे प्रयोग करत आहे ते बंद करा, असं सांगतानाच राऊत यांनी तृतियपंथीयांशी संबंधित एक शब्द वापरून भाजपवर जहरी टीका केली. केंद्रीय पोलीस दलाचा वापर करून आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर आमच्या संरक्षणासाठी पोलिसांची गरज नाही. शिवसैनिक सक्षम आहेत. शिवसैनिक सदैव मरायला आणि मारायला तयार असतो, असं सांगतानाच सरकार आमचं असल्याने आमचे हात नक्कीच बांधलेले आहेत, असंही ते म्हणाले.

संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्पॉन्सर्ड आंदोलन सुरू असल्याचं विधान करत शिवसेनेवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी पलटवार केला. पोलीस स्पॉन्सर्ड, सरकार स्पॉन्सर्ड म्हणता तुम्ही काय करता? केंद्र सरकार स्पॉन्सर्ड, केंद्रीय पोलिस दल स्पॉन्सर्ड, केंद्रीय पोलसी दलाच्या पाठबळावर तुमचीही झुंडशाही सुरू आहे. तुमच्या झुंडशाहीला शिवसैनिकांनी उत्तर दिलं तर तुम्हाला का मिरच्या झोंबतात? कशा करता?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

शिवसैनिक पॉवर आहेत. जे होतंय ते होऊ द्या

तुम्ही आमच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न कराल तर ते शिवसैनिक आहेत. ते स्वस्थ बसणार नाही. आम्हाला सत्तेची पर्वा नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं एक अजरामर वाक्य आहे. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही. सत्ता आमच्यासाठी जन्माला आलीय. सत्ता फक्त खुर्चीची नसते. शिवसैनिक पॉवर आहेत. जे होतंय ते होऊद्या. एकदाच काय ते होईल, असंही ते म्हणाले.

शिवसैनिकही तुमच्या घरापर्यंत घुसतील

राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय एजन्सी येतील. या धमक्या देऊ नका. हिंमत असेल तर सीबीआय, ईडी लावा. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. शिवसैनिकांवर आता या क्षणी कुणाचंही कंट्रोल नाही. अजून काही सुरवात झाली नाही. हा जनतेचा स्फोट आहे. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हालाही घर आहे हे लक्षात ठेवा. कोण तुम्ही? तुम्ही कोण आहात? तुमच्या लायकीप्रमाणे राहा. लक्ष्मण रेषा ओलांडाल तर शिवसैनिकही तुमच्या घरापर्यंत घुसतील. असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्रात सात जन्म घ्यावे लागेल

नवनीत राणांना मोठं केलं जात आहे का? असा सवाल केला असता, आम्ही त्यांना मोठं करत नाही. कालपर्यंत हिंदुत्वावर हल्ले करणारे बंटी बबली आहेत ते. त्यांना भाजप मोठे करत आहे. नवहिंदुत्वादी आहेत त्यांनाही भाजप मोठं करत आहे, असा टोला त्यांनी लगावला. केरळमध्ये भाजपला श्वास घेता येत नाही. पश्चिमबंगालमध्ये ममता बॅनर्जी पुरून उरलीय. महाराष्ट्रात त्यांना सात जन्म घ्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी फडणवीस यांना दिला.

संबंधित बातम्या:

Chhagan Bhujbal on Navneet Rana: शिवसेनेचा महाप्रसाद म्हणजे बुक्कांबा, लाथाटकी आणि बुक्काकोट; भुजबळांनी राणा दाम्पत्यांना फटकारले

Dilip Walse Patil on Navneet Rana: राणा दाम्पत्यांना कुणाची तरी सुपारी, त्याशिवाय एवढं धाडस होऊच शकत नाही; गृहमंत्र्यांचा दावा

Jayant Patil | ‘शिवसेना आता प्रचंड मवाळ झालीये’ जयंत पाटील म्हणतात, शिवसैनिकांनी बराच संयम दाखवला!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.