महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, पण अजित पवार यांच्याबद्दल सस्पेन्स, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी सभा होणार आहे. सभा यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकद लावण्यात आली. पण अजित पवार सभेला येणार की नाही ? अशी चर्चा सुरु झालीय. मात्र अजित पवार येणार असं काँग्रेस आणि ठाकरे गटानं म्हटलंय.

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, पण अजित पवार यांच्याबद्दल सस्पेन्स, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 11:54 PM

नागपूर : छत्रपती संभाजीनगरच्या सभेनंतर, महाविकास आघाडीची दुसरी सभा नागपुरात होतेय. त्यासाठी तयारीही पूर्ण झालीय. पण पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते अजित पवारांवरुन चर्चा सुरु झाल्यात. अजित पवार नागपुरात सभेला येणार की नाही? यावरुन नागपुरात चर्चा रंगलीय. याआधी संभाजीनगरच्या सभेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले नव्हते. मात्र आता अजित पवारांच्या नागपुरातल्या हजेरीवरुन साशंकता व्यक्त करण्यात येतेय. अजित पवार भाजपसोबत जाणार का? असं चर्चेचं वादळ सुरु असताना, नागपुरातल्या सभेवरुन अजित पवारांकडे नजरा लागल्यात.

अजित दादा येणार असं नाना पटोलेही म्हणतायत आणि संजय राऊतही. अजित पवार नागपुरात येणार की नाही? हे काही तासांत स्पष्ट होईल. पण नजरा उद्धव ठाकरेंच्या भाषणावरही असतील. कारण ठाकरे उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होम टाऊनमध्ये येत आहेत. गेल्या काही दिवसांत ठाकरे आणि फडणवीसांमध्ये फडतूसवरुन शाब्दिक चकमक झालीय. उद्धव ठाकरे फडतूस गृहमंत्री म्हटल्यानंतर फडणवीसांनी ठाकरेंना काडतूसनं उत्तर दिलं होतं.

उद्धव ठाकरे काय बोलणार?

सत्तांतरानंतर, ठाकरे गट-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सभा घेऊन वातावरण निर्मिती करतेय आणि मराठवाड्यानंतर महाविकास आघाडीनं आपला मोर्चा विदर्भाकडे वळवलाय. नागपुरातली सभा यशस्वी करण्यासाठी तिघांनीही पूर्ण ताकद लावली आणि मैदानाची पाहणीही केलीय. नागपुरातल्या सभेतून उद्धव ठाकरेंची तोफ फडणवीसांवर धडाडणारच आहे. पण नेहमीप्रमाणं, ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदेंची शिवसेना असेलच.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांचा अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर टोला

नागपुरात महाविकास आघाडीची सभा आहे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्तानं, अमित शाह मुंबईत आलेत. आप्पासाहेब धर्माधिकारींचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारनं सन्मान करण्यात येणार आहे. मात्र अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहण्यासाठी आल्याचा टोला राऊतांनी लगावलाय. विदर्भात आधीच शिवसेनेची इतकी ताकद नव्हती. त्यातही शिंदेंच्या बंडामुळं विदर्भात नव्यानं उभारी घेण्याचं आव्हान ठाकरेंसमोर आहे. त्यामुळे ठाकरे नवीन काय बोलतात, याकडे लक्ष असेल.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.