इंडिया नाव हटवल्यास नोटाबंदी करावी लागणार?, विजय वडेट्टीवार यांची भीती काय?

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवर राज्य सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. नोटाबंदी, इंडिया नावापासून ते मराठा आंदोलनावर त्यांनी भाष्य केलं आहे.

इंडिया नाव हटवल्यास नोटाबंदी करावी लागणार?, विजय वडेट्टीवार यांची भीती काय?
vijay wadettiwarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 9:51 AM

बुलढाणा | 7 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारने इंडिया या शब्दाऐवजी भारत शब्द वापरण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं असून त्यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. इंडिया शब्द बदलण्यासाठी केंद्र सरकार विधेयक आणणार असल्याचीही चर्चा आहे. तशी चर्चाही देशात सुरू आहे. एवढेच नव्हे तर या निमित्ताने इंडिया आणि भारत या नावावरून दोन गट निर्माण झाले आहेत. पण इंडिया शब्द बदलला आणि भारत हा शब्द घेतला तर अनेक ठिकाणी तो बदल करावा लागणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तर इंडिया ऐवजी भारत शब्द वापरल्यास नोटाबंदी होण्याचीही भीती वाटत आहे.

विजय वडेट्टीवार मीडियाशी संवाद साधत होते. केंद्र सरकार संविधानातील इंडिया शब्द बदलण्यासाठी विधेयक आणणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घाबरण्याचे लक्षण आहे. इंडिया म्हणजे भारत हे संविधानात लिहिले आहे. मग नोटांवर ही भारत लिहावे लागेल, कारा नोटबंदी मग. हे सगळं इंडिया आघाडीला घाबरून चालले आहे. राहुल गांधी यांच्या दहशतीमुळेच हे सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यभर पडसाद

जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. काही ठिकाणी जाळपोळ सुरू आहे. तर काही ठिकाणी बंद पुकारला जात आहे. राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचीही मागणी होत आहे. जालन्यात मराठा आंदोलनावेळी नेमके किती लोक जखमी झाले होते याबाबत अजूनही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचा आकडाच सांगितला आहे.

जखमी किती?

मराठा आंदोलन चिरडण्याचा काम सरकारने केले आहे. फक्त आश्वासने दिले होते, मात्र आता मराठ्यांवर लाठी चालवण्यात आली आहे. या हल्ल्यात तब्बल 124 आंदोलक जखमी झाले आहेत, अशी माहिती देतानाच तुम्ही माफी मागितली. याचा अर्थ तुम्ही दोषी आहात. हे आंदोलन चिरडण्याचं काम झालं. ते सरकार पुरस्कृत होतं हे सिद्ध झालं आहे. तुम्ही चुकीचं वागलात म्हणूनच तुम्ही माफी मागत आहात, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

टीव्ही एक रिमोट तीन

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी राज्य सरकारवरही टीका केली. आताचे सरकार म्हणाजे तिजोरी लुटणारे सरकार आहे. पूर्वी आली बाबा चाळीस चोर म्हणायचे. मात्र आता दोन आली बाबा 80 चोर आहेत, अशी राज्याची स्थिती आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 56 इंच छाती फुगवून सांगणाऱ्यांना दुसऱ्याची घर फोडायची वेळ आलीय. कारण तुम्ही स्वकर्तुत्वाने काहीही मिळविले नाही. टीव्ही एक आणि रिमोट तीन अशी राज्याची स्थिती झाली आहे. ज्याला जे बटण दबायचे ते दाबतो आणि तिजोरी लुटतो, असे काम राज्यात सुरू आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.