यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना?; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो. पण ही केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना?

यूपी, पंजाबच्या निवडणुकीसाठीची नौटंकी तर नाही ना?; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागा; विजय वडेट्टीवार यांची मागणी
vijay wadettiwar
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 3:27 PM

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो. पण ही केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीपुरती नौटंकी तर नाही ना? असा सवाल करतानाच आपल्यामुळेच 600 शेतकऱ्यांचा या आंदोलनात जीव गेल्याचं मान्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी, अशी मागणी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. पंतप्रधानांनी वादग्रस्त कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याचं आम्ही स्वागत करतो. पण उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका पाहून तर ही खेळी केली नाही ना? आज कायदे मागे घेतले उद्या सत्तेत आल्यावर पुन्हा हे कायदे आणले तर जाणार नाही ना? केवळ निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठीचा हा फंडा तर नाही ना? असे सवाल करतानाच निवडणुकी आधी महागाई कमी करायची, काही निर्णय घ्यायचे आणि सत्तेत आल्यावर पुन्हा तेच निर्णय राबवायचे ही मोदी सरकारची खेळी राहिली आहे, त्यामुळे आमचा भाजपवर विश्वास नाही, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

कायदे रद्द करायला एवढा उशीर का झाला?

या आंदोलनात 600 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याला जबाबदार मोदी सरकारच आहे. आपल्याचमुळे हे शेतकरी दगावल्याची जाहीर कबुली देत त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. कृषी कायदे रद्द करायला इतका उशीर का केला? 600 शेतकऱ्यांचा बळी घेण्याची काय गरज होती. पूर्वीच कृषी कायदे रद्द केले असते तर शेतकऱ्यांचा विरोध झाला नसता. ग्रामीण भागातील शेतकरी सरकार विरोधात पेटून उठली आहे. त्यांचा भडका उडाला आहे. महागाईमुळे जनता आणि शेतकरी त्रस्त आहे. केवळ पाच दहा रुपयांनी पेट्रोल कमी केल्याने महागाई नियंत्रणात येणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

त्या मृत्यूला जबाबदार कोण?

या कृषी कायद्याविरोधात राज्यात आंदोलन झालं. देशात झालं. राज्यकर्ते त्यांना भेटायला गेले नाही. शेतकरी दिल्लीत पोहोचू नये म्हणून खिळे ठोकले गेले. थंडी, ऊन, वारा, पावसात शेतकरी बसला होता. या दरम्यान 600 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. या मृत्यूची जबाबदारी घ्या. माझ्यामुळेच या लोकांचा मृत्यू झाला हे तुम्हाला देशातील जनतेला सांगावं लागेल. कायदे रद्द केले त्याचं स्वागत करतो. कायदे करून शेतकऱ्यांना वेठीस धरलं त्याला जबाबदार कोण? शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झालं. त्यांच्या आंदोलनामुळेच कायदे मागे घ्यावे लागले, असंही ते म्हणाले.

केंद्रातील सरकार जाईल म्हणून सरकार झुकलं

शेतकऱ्यांसाठी काँग्रेसनेही आंदोलन केलं होतं. काँग्रेसने समर्थन केलं. रस्त्यावर उतरली. आमच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आम्ही या कायद्याला विरोध केला. यावेळी भाजपकडून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या अंगावर गाडी टाकली. आंदोलन चिरडण्याचे हे धंदे होते. पण शेतकरी ठाम राहिला. शेतकऱ्यांच्या संघर्षाचं यश आणि निवडणुकीत बसलेल्या चपराकीचा हा विजय आहे. यूपीत हादरा बसेल, दिल्लीतील सरकार जाईल म्हणूनच सरकारला झुकावं लागलं, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Breaking News: शेतकरी आंदोलनासमोर मोदी सरकार झुकलं, तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा, मोदींनी देशाची माफीही मागितली

Narendra Modi on Farm Law: केंद्रीय कृषी कायदे रद्द, सर्वात मोठी घोषणा करताना नरेंद्र मोदी काय म्हणाले?

Modi Withdraws 3 Farm Laws LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा, वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.