Nana Patole: काँग्रेसच्या काही मंत्र्यांचं मंत्रिपद जाणार?, नाना पटोलेंची मंत्रीपदासाठी सेटिंग; मंत्रिमंडळातील फेरबदलाची जोरदार हवा

cabinet reshuffle: येत्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या (congress) काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nana Patole: काँग्रेसच्या काही मंत्र्यांचं मंत्रिपद जाणार?, नाना पटोलेंची मंत्रीपदासाठी सेटिंग; मंत्रिमंडळातील फेरबदलाची जोरदार हवा
नाना पटोलेंची मंत्रीपदासाठी सेटिंग; मंत्रिमंडळातील फेरबदलाची जोरदार हवाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 1:02 PM

मुंबई: येत्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल (cabinet reshuffle) होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या (congress) काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नव्या फेरबदलात आपल्या वाट्याला मंत्रिपद यावे म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनीही हायकमांडकडे सेटिंग लावल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं होतं. मात्र, प्रदेशाध्यक्षपदासह मंत्रीपदही देण्यात यावं अशी पटोले यांची मागणी होती. त्यावेळी पटोले यांची ही मागणी पूर्ण करण्यात आली नव्हती. त्यामुळे आता नव्या फेरबदलावेळी पटोले यांची ही मागणी पूर्ण करण्यात येणार का? आली तर पटोले यांच्याकडे कोणतं खातं दिलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेली ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई, काही मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळातील रिक्त झालेली पदे, निधीचा असमतोल वाटप आणि विकास प्रकल्प या सर्व मुद्द्यांवर येत्या 8 किंवा 9 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची बैठक होत आहे. कोरोनाचं संकट ओसरल्याने मंत्रिमंडळात फेरबदल करून पुन्हा नव्या दमाने राज्याच्या जनतेसमोर जाण्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं. याच बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलाची तारीख निश्चित करण्याबाबत आणि महामंडळांच्या नियुक्त्यांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

पटोलेंना मंत्रिपद हवंय

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं होतं. तर, एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या असल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवलं होतं. त्यानंतर 2021पासून विधानसभा अध्यक्षपद रिक्तच आहे. मात्र, प्रदेशाध्यक्षपदाबरोबर मंत्रिपदही देण्यात यावे अशी मागणी पटोले यांनी हायकमांडकडे केली होती. मात्र, त्यांची ही मागणी पूर्ण झाली नव्हती. आता काँग्रेसच्या काही मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड खराब असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येणार असून त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याची अनेक मंत्रीपदे रिक्त होणार असून त्यापैकी एक मंत्रीपद मिळावं म्हणून नाना पटोले यांनी जोरदार हालचाली सुरू केल्याचं सांगितलं जातं.

खात्यांची आदलाबदल होणार?

दरम्यान, ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई केल्यानंतरही राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याकडून भाजप नेत्यांवर काहीच कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे शिवसेनेत खदखद आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडे असलेलं गृहखातं शिवसेनेने घ्यावं, अशी शिवसेनेतूनच मागणी होत आहे. शिवसेनेकडील वन खाते राष्ट्रवादीला देऊन गृहखाते घेण्याची मागणी होत आहे. तसेच काँग्रेसला राष्ट्रवादीकडील अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय खातं हवं आहे. यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra Cabinet : राज्याच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यातच मोठे फेरबदल? ठाकरे, पवारांमध्ये महत्वाची बैठक होणार- सूत्र

राज्यपाल- ठाकरे सरकार वादाचा नवा अंक, भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु निवडीची प्रक्रिया सुरु

Pravin Darekar: कधी मजूर तर कधी बिझनेसमन! 350 रुपये मजुरीवर काम केलंय दरेकरांनी! खरंच?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.