आईला मामाकडे पाठवलं, मग मुलीचा गळा घोटला, शॉक लागल्याचा केला बनाव

मुलीने ही सोयरीकी आठ दिवसांत मोडली. त्यामुळे बदनामी गेल्याच्या रागातून शुभांगीच्या वडील व भावांनी तिची हत्या केली.

आईला मामाकडे पाठवलं, मग मुलीचा गळा घोटला, शॉक लागल्याचा केला बनाव
शुभांगी जोगदंडImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 9:27 AM

नांदेड : नांदेड जिल्ह्यामध्ये (Nanded News) ऑनर किलिंगचा (owner killing) धक्कादायक प्रकार समोर आलाय. जन्मदात्या बापाने २३ वर्षीय मुलीची हत्या केली. हत्या करुन मुलीचा मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राख ओढ्यात फेकून दिली.  या प्रकरणी मुलीच्या बाप व भावासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होत आहे. नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महीपाल गाव लिंबगाव पोलिस ठाण्‍यापासून ८ किलोमीटर अंतरावर आहे.

गावातील जनार्दन लिंबाजी जोगदंड हे मध्यमवर्गीय शेतकरी. त्यांची २३ वर्षीय शुभांगी जोगदंड ही नांदेडच्या आयुर्वेदीक महाविद्यालयात BHMS च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेम होते. परंतु हे प्रेम कुटुंबीयांनी मान्य नव्हते. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी तिची सोयरीक दुसरीकडे करुन दिली होती.

मुलीने ही सोयरीकी आठ दिवसांत मोडली. त्यामुळे बदनामी गेल्याच्या रागातून शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड, भाऊ कृष्णा जोगदंड, चुलत भाऊ गिरीधारी जोगदंड, शेषराव जोगदंड, गोविंद जोगदंड व मामा केशव शिवाजी कदम यांनी २२ जानेवारी रोजी तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह खताच्या गोण्यात टाकून शेतात  नेला. शेतात ज्वारीच्या पिकांत सरण रचून शुभांगीचा मृतदेह जाळून टाकला.

हे सुद्धा वाचा

आईला पाठवले मामांकडे

शुभागांची हत्या करण्यापुर्वी तिच्या आईला मामांकडे पाठवण्यात आले. त्यानंतर इलेक्ट्रीक शेगडी पेटवत असताना शुभांगीला शॉक लागल्याचे तिच्या आईला सांगितले. सरणाला अग्नी देण्यापुर्वी शुभांगीच्या आईला शेतात आणण्यात आले. तिला फक्त शुभांगीचा चेहरा दाखवला. त्यानंतर सरण पेटवण्यात आले. या प्रकरणाचे बिंग फुटल्यानंतर शुभांगीच्या आईला धक्काच बसला. आई मामाकडे असल्याने तिला या घटनेची कुणकुण सुद्धा लागली नाही.

मोठ्या मुलीला नव्हती कल्पना

पिंपरी महीपाल गावातील लोकांचा शेती हेच उपजीविकेचे साधन. जनार्दन लिंबाजी जोगदंड हे मध्यमवर्गीय शेतकरी. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न गावातच झाले होते. परंतु बहिणीच्या हत्येची कल्पना तिला आली नाही.

आरोपींना ३ फेब्रवारीपर्यंत कोठडी

२६ जानेवारी रोजी एका निनावी फोनमुळे शुभांगीच्या हत्येचा प्रकार उघड झाला. त्यानंतर शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड, भाऊ कृष्णा जोगदंड, चुलत भाऊ गिरीधारी जोगदंड, शेषराव जोगदंड, गोविंद जोगदंड व मामा केशव शिवाजी कदम यांना पोलिसांनी अटक केली. ३ फेब्रवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी दिली आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.