Video: पवार म्हणाले राणेंनाही अटक झाली होती, 9 तासाच्या चौकशीनंतर नारायण राणेंनी पवारांना आठवणीनं उत्तर दिलं

आमचा कुणी दाऊद दोस्त नाही, तो देशद्रोही आहे. त्याच्याशी मलिकांचे संबंध, म्हणून आम्ही राजनामा मागतोय. असे राणे म्हणाले आहेत तर यावरच बोलताना, तुम्ही आमचे राजीनामे मागता. तुम्ही हेच केलं आयुष्यभर, हीच तुमची पुण्याई आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Video: पवार म्हणाले राणेंनाही अटक झाली होती, 9 तासाच्या चौकशीनंतर नारायण राणेंनी पवारांना आठवणीनं उत्तर दिलं
राणेंची पवारांवर घणाघाती टीकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 11:32 PM

मुंबई : सकाळीच शरद पवारांनी (Sharad Pawar) नवाब मलिकाचा )(Nawab malik) राजीनामा मागणाऱ्या भाजप नेत्यांचा समाचार घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जुने सहकारी राणे साहेब (Narayan Rane) यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही. उद्या पंतप्रधान पुण्यात येतील तेव्हा ते कदाचित याचा खुलासा करतील, असा टोला लगावतानाच एक न्याय राणेंना लावता अन् दुसरा न्याय मलिकांना लावता याचा अर्थ हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी भाजपवर केली. त्यानंतर नारायण राणेंनी आता पवारांवर घणाघाती पलटवार केला आहे. मी शरद पवारांचे स्टेटमेंट ऐकले. वा पवारसाहेब, काय बोलावं की कीव करावी हे कळेना. आमचा कुणी दाऊद दोस्त नाही, तो देशद्रोही आहे. त्याच्याशी मलिकांचे संबंध, म्हणून आम्ही राजनामा मागतोय. असे राणे म्हणाले आहेत तर यावरच बोलताना, तुम्ही आमचे राजीनामे मागता. तुम्ही हेच केलं आयुष्यभर, हीच तुमची पुण्याई आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पवार काय म्हणाले होते?

नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक केली. गेली 20 वर्ष ते विधानसभेत आहेत. त्या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. आता त्यांचे संबंध दाऊदशी असल्याचा दिसतोय. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याला दाऊदचा जोडीदार धरलं जातं. कारण नसताना आरोप केला जातो. मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावरही आरोप केले होते. हे लोक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला चिंता करण्याचं कारण नाही. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जातेय. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांना यातना दिल्या जात आहेत. जाणूनबाजून हे केलं जातंय, असं शरद पवार म्हणाले. त्यावर भाजप नेत्यांच्याही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राणेंची 9 तास पोलीस चौकशी

दिशा सॅलियन बाबात केलेल्या आरोपांमुळे राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आसून मालवणी पोलिसांकडून त्यांची 9 तास पोलीस चौकशी करण्यात आली आहे. अमित शाह यांना फोन केल्यावर पोलिसांनी सोडलं, असेही यावेळी राणेंनी सांगितलं आहे. तर त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबतही मोठे गोप्यस्फोट केले आहेत. मला दोन दिवसांपूर्वी 41A ची नोटीस आली होती, आपलं म्हणणं सागण्यासाठी यावे अशी नोटीस होती. त्यात असे म्हणाले की दिशा सॅलियानच्या आईने तक्रार केली असल्याने तुम्हाला यावं लागेल. मी आणि नितेश काय बोललो, तिची आत्महत्यान नाही हत्या आहे, हे आम्ही वारंवार बोलत होते. त्यानंतर मुंबईच्या महापौरांनी त्यांच्या कुटुंबियांना तक्रार करायला भाग पाडलं. आमची बदनामी होतेय. अशी तक्रार केली. खोटी तक्रार केली. आम्हाला अधिकार आहे. मी मंत्री नितेश आमदार आहे. कोणावर अन्याय होत असेल तर आम्हाला अधिकार आहे बोलायचा, तुम्ही काहीही करा आम्ही गप्प बसणार नाही, असेही राणेंनी यावेळी ठणकावले आहे.

Breaking : नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट! तब्बल 9 तासाच्या चौकशीनंतर राणे नेमकं काय म्हणाले?

Pm Modi : दिल्ली-पुणे-दिल्ली, कसा असेल मोदींचा पुणे दौरा? वाचा एका क्लिकवर

पटापट पेट्रोलचे टँक भरून घ्या, मोदी सरकारची इलेक्शन ऑफर संपणार, राहुल गांधी यांचा खोचक टोला

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.