AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला, त्यावेळेस नेमकं काय म्हणाले उद्धव?; वाचा सविस्तर

भाजप नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राजकीय हाडवैर सर्वश्रृत आहे. (narayan rane's phone call to uddhav thackeray for medical college)

जेव्हा राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला, त्यावेळेस नेमकं काय म्हणाले उद्धव?; वाचा सविस्तर
| Updated on: Feb 05, 2021 | 4:46 PM
Share

मुंबई: भाजप नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राजकीय हाडवैर सर्वश्रृत आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी राणे सोडत नाहीत. टीकेचा स्तरही अगदी खालच्या पातळीचा असतो. पण त्याच राणेंवर चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करण्याची वेळ आली. त्याचं कारणही तसंच होतं. (narayan rane’s phone call to uddhav thackeray for medical college)

सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेजची स्थापना केली आहे. त्याचा उद्या शनिवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या मेडिकल कॉलेजच्या काही फायली मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यानिमित्ताने राणेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करावा लागला. स्वत: राणेंनीच त्याची माहिती दिली. परवानगीसाठी फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली होती. त्यावेळी मी त्यांना फोन केला. तुमच्याकडे परवानगीसाठी फाईल आली आहे, सही करा असं त्यांना सांगितलं. त्यावर मुख्यमंत्री ठीक आहे बोलले. ते म्हणाले, माझ्याकडे फाईल आली आहे का? मी म्हटले, जीआर काढा. रुटीन फाईल आहे. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले बरं. आमच्या दोघांमध्ये तेवढाच संवाद झाला, असं राणे म्हणाले.

दुरावा संपला?

त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी काही राजकीय किंवा कौटुंबीक विषयावर बोलणं झालं का? असा सवाल माध्यमांनी राणेंना केला. त्यावर सगळेच संवाद मीडियाला सांगायचे नसतात, असं सांगत राणेंनी राजकीय चर्चांना हवा दिली आहे. राणे यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने राणे-ठाकरेंमधील दुरावा कमी होत असल्याचं बोललं जात आहे. मेडिकल कॉलेज होणं हे राणेंचं स्वप्न होतं. मनात आणलं असतं तर उद्धव ठाकरे यांनी या कामाला खो घातला असता. पण त्यांनी राणेंच्या फायली क्लिअर केल्या. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील सुसंवादाचा धागा निर्माण झाला आहे, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

कशी झाली राणेंची स्वप्नपूर्ती ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांमुळे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकलो. माझं ऋण आहे. या जिल्ह्याचं आरोग्य चांगलं राहावे म्हणून हॉस्पिटल काढलं. मेडिकल कॉलेजचं स्वप्न पाहिले. जिल्ह्यासाठी प्रत्येक स्तरावर खूप प्रकल्प सुरू केले. चार वर्षापासून मेडिकल कॉलेजसाठी मेहनत घेतली. सुसज्ज, आधुनिक यंत्रणा असलेलं हॉस्पिटल आहे. उद्या मेडिकल कॉलेज सुरू होत आहे. कॉलेज सुरू होत आहे याचा खूप आनंद. संकल्प केला आणि त्यात यश मिळतेय याचा आनंद आहे. पहिल्याच वर्षी प्रवेश फुल झाले. दर्जेदार कॉलेज बांधलंय. क्लासरूम, हॉस्टेल एअर कंडिशन आहेत. उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहा येत आहेत. त्यांच्या हस्ते मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होत आहे. हा माझा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे, असं राणे म्हणाले.

विरोध झाला

इथल्या नेत्यांची कीव येते. त्यांनी विरोध केला. जसा विमानतळासाठी जागा अधिग्रहणा वेळी विरोध झाला, तसाच माझ्या हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजच्या जागेलाही केला. पण आज सर्व विरोधकांना सांगतो या आणि माझे हॉस्पिटल पाहा. भविष्यात तरी अशा प्रकल्पांना विरोध करू नका. प्रकल्प जनतेसाठी आहे. चांगले डॉक्टर निर्माण व्हावेत. आज आशीर्वाद द्या. तुमचे आशीर्वाद हवे आहेत, असंही ते म्हणाले. (narayan rane’s phone call to uddhav thackeray for medical college)

संबंधित बातम्या:

Maharashtra Congress President | काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी

काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळावं, माणिकराव ठाकरेंची पहिल्यांदाच उघड मागणी

आर आर पाटलांच्या पोलीस भावाचा सत्कार, आबांच्या आठवणींनी अजितदादा गहिवरले

(narayan rane’s phone call to uddhav thackeray for medical college)

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.