Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

71 वर्षीय कोरोना रुग्णाला डिस्चार्ज, नाशिक जिल्हा रुग्णालयाचा कारभार

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असताना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून एका 71 वर्षीय वृद्धाला डिस्चार्ज दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Nashik 71 year old corona positive patient get discharged from civil hospital).

71 वर्षीय कोरोना रुग्णाला डिस्चार्ज, नाशिक जिल्हा रुग्णालयाचा कारभार
Follow us
| Updated on: Jul 29, 2020 | 5:59 PM

नाशिक : एका 71 वर्षीय वृद्धाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असताना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा रुग्ण येवला तालुक्यातील अंदरसुल गावाचा रहिवासी आहे. दरम्यान, याबाबत अंदरसुल गावात माहिती पसरताच एकच खळबळ उडाली. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असताना घरी कसा पाठवला? असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे (Nashik 71 year old corona positive patient get discharged from civil hospital).

या घटनेतून जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अंदरसुल येथील 71 वर्षीय वृद्धाची अचानक प्रकृती खालावली. त्यामुळे वृद्धाला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या रुग्णाचा अहवाल 27 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला. मात्र, तरीही रुग्णाला दुसऱ्याच दिवशी रात्री डिस्चार्ज देण्यात आला (Nashik 71 year old corona positive patient get discharged from civil hospital).

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

गावकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी स्थानिक आरोग्य विभागाकडे विचारणा केली. “रुग्णाचा उपचाराचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे कदाचित डिस्चार्ज देण्यात आला”, असं स्थानिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं. यावेळी गावकऱ्यांनी रुग्णाची प्रकृती बरी नसल्याने उपचार केले जावेत, अशी मागणी केली.

गावकऱ्यांनी कोरोनाबाधित रुग्णावर उपचार व्हावा यासाठी शासकीय रुग्णालयातून रुग्णवाहिका मागवली. मात्र, दोन तासाहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गावकऱ्यांनी खासगी रुग्णवाहिका मागवली. रुग्णाला उपचारासाठी नगरसुल येथील कोव्हिड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलं. तिथे वृद्ध रुग्णाची तपासणी केली असता त्यांचं ऑक्सिजन लेव्हल फक्त 62 इतकं होतं. रात्रभर उपचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णाला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या सर्व घडामोडींकडे बघितल्यावर रुग्णाला वेळेवर शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही, तसेच पहिल्या दिवशी रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही डिस्चार्ज दिला गेला. यातून नाशिक जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, RTE ची कक्षाही रुंद, कोणकोणते बदल?

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.