Nashik Citybus| नाशिकमध्ये सिटीलिंकचा प्रवास गुपचूप केला महाग; किती रुपयांची झाली वाढ?

नाशिकमध्ये सिटीलिकंतर्फे नागरिक आणि विद्यार्थ्यांना सवलतीचे पास दिले जातात. महापालिकेने नुकताच एक ठराव घेतला आहे. त्यानुसार आता दृष्टीहीन बांधवांना मोफत प्रवासाची सुविधा या बसमधून देण्यात येणार आहे.

Nashik Citybus| नाशिकमध्ये सिटीलिंकचा प्रवास गुपचूप केला महाग; किती रुपयांची झाली वाढ?
Nashik City bus
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 1:21 PM

नाशिकः नाशिककरांसाठी अतिशय सुखदायी सेवा देणाऱ्या सिटीबसचा प्रवास नवीन वर्षात महाग झाला आहे. महापालिका प्रशासनाने अतिशय गुपचूपपणे या बसभाड्यात 5 टक्केची वाढ केलीय. नाशिक महानगर परिवहन लिमिटेड कंपनीने दरवर्षी पाच टक्के भाडेवाढीचे धोरण यापूर्वीच मंजूर केले आहे. त्यामुळेच संचालक मंडळाच्या बैठकीत ही वाढ केल्याची माहिती, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. मात्र, आधीच महागाई आणि कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला या निर्णयाने अजून झळ बसणार आहे.

42 मार्गांवर 148 बस

सिटीलिंक बससेवेची 8 जुलै पासून सुरुवात झाली आहे. त्यात पाच टप्प्यात 250 बस रस्त्यावर उतवण्याचे नियोजन आहे. सध्या 42 मार्गांवर 148 बस धावतात. नाशिक महानगरपालिकेने सुरू केलेल्या सिटीलिंक बससेवेला काही भागात चांगला प्रतिसाद मिळत असून, दिवसाकाठचे उत्पन्न तब्बल 10 लाख रुपयांपेक्षाही पुढे गेले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या या बस सेवेला अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. हा राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या संपाचा परिणाम आहे. या बससेवेने आतापर्यंत 9 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. मात्र, या सेवेवर 18 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तूर्तास तरी महापालिका 9 कोटींनी तोट्यात आहे.

सवलतींचे विविध पास

सिटीलिकंतर्फे नागरिक आणि विद्यार्थ्यांना सवलतीचे पास दिले जातात. महापालिकेने नुकताच एक ठराव घेतला आहे. त्यानुसार आता दृष्टीहीन बांधवांना मोफत प्रवासाची सुविधा या बसमधून देण्यात येणार आहे. सध्या या बससेच्या पासचा लाभ नागरिक मोठ्या संख्येने उठवत आहेत. 3 हजार 178 विद्यार्थ्यांनी या बसचा पास काढला आहे. बसच्या एक दिवसीय पासचा लाभ 45 हजार 482 जणांनी घेतला आहे. साप्ताहिक पास 119 आणि मासिक पासचा लाभ 194 प्रवाशांनी घेतला आहे. त्रैमासिक पासचा लाभ 12 प्रवाशांनी घेतला आहे.

कामगारांना मोठी मदत

सध्या राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करताना अव्वाच्या सव्वा लूट सुरू आहे. हे पाहता सिन्नर ,ओझर, त्रंबकेश्वर, भगूर, गिरणारे, सायखेडा, मखमलाबाद या ग्रामीण भागातून सिटीलिंक बसला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नाशिक उद्योनगरी. ग्रामीण भागातून अनेक कामगार नाशिकमध्ये रोजगारासाठी येतात. त्यांना रोज खासगी वाहनाने प्रवास करून येणे अवघड असते. सातपूर भागात अनेक कामगारांचा रोज राबता असतो. त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी सिटीलिंक बससेवेने उत्तम जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे हे कामगार रोज सिटर रिक्षातून असुरक्षित प्रवास करण्याऐवजी थेट सिटीलिंक बससेवेचा पर्याय निवडत आहेत.

इतर बातम्याः

Sahitya Sammelan | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे बिनविरोध

Nashik| अजब तुझे सरकार…अन् मृत ग्रामसेवकाच्या नावावरची 28 लाखांची वसुली टळली…!

Nashik Election|नाशिकमध्ये 500 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करण्याच्या हालचाली; भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.