Omicron| ओमिक्रॉनची धास्ती, कोरोना सुस्साट; नाशिकमध्ये पुन्हा 442 रुग्णांवर उपचार सुरू
नाशिकमध्ये बहुतांश ठिकाणी नागरिक मास्कच वापरत नाहीत. विशेष म्हणजे महापालिका आणि प्रशासन फक्त इशारे देते. मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई होताना दिसत नाही.
नाशिकः नाशिकमध्ये सापडलेला ओमिक्रॉनचा रुग्ण, राज्यभरातही ठिकठिकाणी सापडणारे नवे ओमिक्रॉन रुग्ण, नाशिकमध्ये कमी झालेले लसीकरण आणि त्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारे कोरोना रुग्ण पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवतायत. जिल्ह्यात पुन्हा एकदा सध्या कोरोनाच्या 442 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 094 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण
जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 37, बागलाण 16, चांदवड 08, देवळा 09, दिंडोरी 12, इगतपुरी 38, कळवण 09, मालेगाव 07, नांदगाव 11, निफाड 52, पेठ 02, सिन्नर 30, सुरगाणा 05, त्र्यंबकेश्वर 03, येवला 03 अशा एकूण 242 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 187, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 06 तर जिल्ह्याबाहेरील 07 रुग्ण असून अशा एकूण 442 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार 282 रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिक ग्रामीणमधील बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीणमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये नाशिक 02, बागलाण 01, दिंडोरी 02, इगतपुरी 12, मालेगाव 02, निफाड 03 अशा एकूण 22 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मध्ये 97.16 टक्के, नाशिक शहरात 98.19 टक्के, मालेगावमध्ये 97.13 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.80 टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.78 टक्के इतके आहे. नाशि जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजपर्यंत कोरोनामुळे 4 हजार 240 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 22, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 746 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नियमाचे पालन नाही
नाशिक जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. महापालिकेने जे नागरिक मास्क घालणार नाही, त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा दिला आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या नियमाचे कोणीही पालन करत नाही. सुरक्षित अंतर आणि इतर नियम सोडा. मात्र, बहुतांश ठिकाणी नागरिक मास्कच वापरत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढले, तर आश्चर्य वाटू नये. विशेष म्हणजे महापालिका आणि प्रशासन फक्त इशारे देते. मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई होताना दिसत नाही.
इतर बातम्याः
1 हजार कोटींच्या जमिनी घोटाळ्याचा आरोप, आता सुरेश धस म्हणतात, कोर्टात बघू!