Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Corona | धक्कादायक, नाशिकमध्ये दिवसभरात तब्बल 3035 जण पॉझिटिव्ह, एका रुग्णाचा मृत्यू!

राज्य टास्क फोर्स आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढाव्यात 12 ते 15 जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या दीडपट वाढण्याची भीत व्यक्त केली होती. नाशिक जिल्ह्यात आता तो अंदाज खरा ठरताना दिसत आहे.

Nashik Corona | धक्कादायक, नाशिकमध्ये दिवसभरात तब्बल 3035 जण पॉझिटिव्ह, एका रुग्णाचा मृत्यू!
Corona test
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 10:08 AM

नाशिकः नाशिकमध्ये कोरोना (Corona) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस अतिशय धक्कादायक पद्धतीने वाढत होताना दिसत असून, दिवसभरात 3035 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरले आहे. 3035 पैकी नाशिक शहरातील 1678 रुग्ण असून, ग्रामीण भागातील 1185, मालेगाव महापालिका हद्दीत 61 तर जिल्हा बाह्य रुग्णांचे प्रमाण 111 आहे. शिवाय नाशिक महापालिका क्षेत्रात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंदही आहे. या तुलनेत दिवसभरात 1350 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या तब्बल 10982 वर गेली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

नाशिक जिल्ह्यात तब्बल दिवसाला तीन-तीन हजार रुग्ण सापडत असल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत इशारा दिला आहे. कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. हे सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. उपचाराची व्यवस्था निर्माण करण्यात प्रशासन कोणतीही कसर ठेवत नसताना नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून आपली जबाबदारी सुद्धा पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. अन्यथा आगामी काळात निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, असा इशाराही दिला आहे.

अंदाज ठरतोय खरा

राज्य टास्क फोर्स आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढाव्यात 12 ते 15 जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या दीडपट वाढण्याची भीत व्यक्त केली होती. नाशिक जिल्ह्यात आता तो अंदाज खरा ठरताना दिसत आहे. ग्रामीण भागातही कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. दक्षतेचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यात सोळा कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालय, मालेगाव जिल्हा रुग्णालय, पिंपळगाव रुग्णालयासोबतच कळवण, नांदगाव, येवला, इगतपुरी, वणी, सुरगाणा, पेठ येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी तब्बल अठराशे खाटांची संख्या उपलब्ध आहे. शिवाय ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा आहे.

आज 3035 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते हे सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. उपचाराची व्यवस्था निर्माण करण्यात प्रशासन कोणतीही कसर ठेवत नसताना नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून आपली जबाबदारी सुद्धा पार पाडावी असे आवाहन पुन्हा करण्यात येत आहे. अन्यथा आगामी काळात निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही याची नोंद घ्यावी. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

इतर बातम्याः

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Nashik Jobs : घरबसल्या नोकरी मिळवा; नाशिकमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा, कसे व्हाल सहभागी?

Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात 16 कोविड सेंटर सुरू; कुठे मिळतायत उपचार?

केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.