नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत, शिवसेना अन् काँग्रेस राजी होणार का?

भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे. त्याचा निकाल लवकरच येईल, परंतु निकालाची वाट न पाहता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे.

नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत, शिवसेना अन् काँग्रेस राजी होणार का?
Mahavikas Aghadi
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 9:03 AM

नाशिकः आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने शिवसेना व कॉंग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. मात्र, त्यांच्या या आवाहनाला शिवसेना आणि काँग्रेस कसा प्रतिसाद देणार याकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर नेमकं काय सुरू, जाणून घेऊयात…

भुजबळांचा पुढाकार…

नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या. त्यावेळी 29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय होते. या बहुसदस्यीय प्रभाव पद्धतीचा भाजपला पुरेपुर फायदा झाला. त्यांनी महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. आता आगामी एक-दोन महिन्यांत कधीही महापालिका निवडणूक होऊ शकते. ते पाहता सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भुजबळांनी आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे.

कार्यकर्त्यांची घेतली बैठक

छगन भुजबळांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक येथील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देविदास पिंगळे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष अॅड. गौरव गोवर्धने, शहर सरचिटणीस संजय खैरणार, विधानसभा अध्यक्ष किशोर शिरसाठ, विभाग अध्यक्ष शंकर मोकळ, मनोहर कोरडे, मुजाहिद शेख, जिवन रायते, मकरंद सोमवंशी, प्रांतिक सदस्य महेश भामरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

ओबीसी निकालाची वाट पाहू नका

बैठकीत भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे. त्याचा निकाल लवकरच येईल, परंतु निकालाची वाट न पाहता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे. नाशिक महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संख्याबळ सध्या जरी कमी असले तरी यंदाच्या वेळेस मात्र आपल्याला ती भरपाई करावी लागणार असून, जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी करावी. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अधिक वाढविण्यासाठी काम करावे. त्यादृष्टीने अधिक प्रयत्न करावे. तसेच विविध उपक्रम राबवीत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.

सर्व जागांचीही तयारी ठेवा

भुजबळ म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकारला संपूर्ण राज्यातील जनतेची पसंती असून वरिष्ठ पातळीवर सन्मानजनक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तरीदेखील संपूर्ण जागांवर आपल्याला लढायची तयारी करावी. त्यासाठी शहरात इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या वार्डात निवडणुकीच्या कामाला लागावे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलून, त्या ठिकाणी सक्रिय सदस्याला जबाबदारी द्यावी. शहरातील सर्व सहा विभागात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन जबाबदारीचे वाटप करण्यात यावे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी दृष्टीने अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Thief’s letter:‘सॉरी मला माफ करा’ म्हणत चोरट्याचे अफलातून पत्र, पुढे जे काही झाले ते वाचून व्हाल थक्क!

Nashik Train| नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या भुसावळ-इगतपुरी मेमूचा आज श्रीगणेशा; 18 रद्द गाड्याही आजपासून पूर्ववत

Nashik Accident| सेल्फी हजेरीची धावपळ कर्मचाऱ्याच्या जीवावर; दुसऱ्या घटनेत सायकलपटूला उडवले!

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...