Nashik|नाशिक जिल्ह्यात 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर, काय आहे योजना?

नाशिक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेतून तब्बल 72935 नागरिकांना हक्काचं घर मिळणार आहे.

Nashik|नाशिक जिल्ह्यात 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर, काय आहे योजना?
घराचा प्रतिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 12:29 PM

नाशिकः एक अतिशय आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेतून तब्बल 72935 नागरिकांना हक्काचं घर मिळणार आहे. या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसोबतच कामे अधिक दर्जेदार करावी. त्यासासाठी कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

नियोजन भवनात कार्यशाळा

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे नाशिक जिल्हा ‘महा आवास’अभियान 2.0 जिल्हास्तरीय कार्यशाळा झाला. यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. कार्यशाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके, जयंत ठोंबरे यांच्यासह जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, प्रशासक आदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

अधिकाऱ्यांना निर्देश

पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, समाजातील गरजू व घरापासून वंचित असलेल्या लोकांना ‘महा आवास’ अभियानांतर्गत प्रथम प्राधान्य देवून त्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावेत. घर बांधण्यासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारत बांधतांना त्यांचा कामाचा दर्जा खालावणार नाही याकडे संबधित अधिकारी व यंत्रणा यांनी कटाक्षाने व जबाबदारीने लक्ष देणे आवश्यक आहे. शासनाने या उपक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अधिकाधिक तळागाळातील गरजू घटकांपर्यत घरकुलाचा लाभ पोहचेल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे व कामे गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

72935 घरकुले पूर्ण

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके यांनी यावेळी ‘महा आवास’ अभियान ग्रामीण नाशिक जिल्हा बाबत माहिती दिली. बावके म्हणाल्या, सन 2016-17 पासून 20 नोव्हेंबर, 2020 हा दिवस राष्ट्रीय आवास दिन म्हणून साजरा केला जातो. 2020-21 वर्षातील ‘महा आवास’ अभियान-ग्रामीण प्रमाणेच सन 2021-22 वर्षात देखील राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत ‘महा आवास’ अभियान-ग्रामीण 2.0 राबविण्याचे निश्चित केले आहे. सन 2020-21 या वर्षातील ‘महा आवास’ अभियान कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5059 व राज्य पुरस्कृत आवास योजनांतर्गत 1775 अशी एकूण 6774 घरकुले नाशिक जिल्ह्यात पूर्ण करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत प्राधान्यक्रम यादीतील 69955 लाभार्थ्यांपैकी 58635 (85.49%) घरकुले पूर्ण झाली आहेत. राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये देखील 19111 घरकुलांपैकी 14300 (75.42%) घरकुले म्हणजेच एकूण 72935 घरकुले पूर्ण झाली आहेत. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांतील शिल्लक घरकुले या ‘महा आवास’ अभियान-ग्रामीण 2.0 मध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत.

18668 घरे साकारणार

आवास प्लस (ड यादी) मध्ये 288171 कुटुंबांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 234476कुटुंब सिस्टीमद्वारे पात्र झालेले आहेत. त्यांची अंतिम प्राधान्यक्रम यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर यादी ग्रामपंचायत निहाय तयार झाल्यावर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2021-22 करिता प्राप्त उद्दिष्ट 18668 ची मंजुरी ‘महा आवास’ अभियान ग्रामीण 2.0 मध्ये देण्यात येईल. या अभियानाच्या 1 ते 10 उपक्रमांमध्ये नाशिक जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके यावेळी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘महा आवास’ अभियान योजनेचे पोस्टर व जिंगल्स यांचे अनावरण करण्यात आले.

इतर बातम्याः

Nashik Omicron| कोरोनाची वावटळ; रुग्णसंख्या 2 हजारांच्या घरात, कारभारी बाहेर पडताना जरा जपून…!

Nashik Crime| 16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा; शासनालाही 51 कोटींचा चुना, नेमका घोटाळा काय?

Nashik Omicron| सर्व यात्रांवर बंदी, लसीकरण न झाल्यास कटू निर्णय; मंत्री भुजबळांनी काय दिला इशारा?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.