नाशिक पालिका आयुक्तांच्या तंबी, खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांना दाखल करून घेणं सुरू

प्रशासनाच्या दणक्यानंतर अखेर डॉक्टरांनी घूमजाव करत आपली भूमिका बदलली असून, सेवा पूर्ववत करण्याचं आश्वासन दिलंय. Nashik Municipal Commissioner private hospitals

नाशिक पालिका आयुक्तांच्या तंबी, खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांना दाखल करून घेणं सुरू
Nashik Municipal Commissioner private hospitals
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 9:29 PM

नाशिकः नाशिकच्या हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या संघटनेला कारवाईची तंबी दिलीय. दरम्यान महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून हॉस्पिटलवर अवाजवी बिलासंदर्भात सुरू असलेली कारवाई आणि सोशल मीडियावर हॉस्पिटलचे निघत असलेले धिंडवडे यामुळे डॉक्टर संघटनांनी हा दबाव टाकण्याची शहरात चर्चा आहे. प्रशासनाच्या दणक्यानंतर अखेर डॉक्टरांनी घूमजाव करत आपली भूमिका बदलली असून, सेवा पूर्ववत करण्याचं आश्वासन दिलंय. (Nashik Municipal Commissioner action, doctors of private hospitals start admitting corona patients)

…म्हणून डॉक्टरांनी काही काळ काम बंद करण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली

सोशल मीडियावर हॉस्पिटलबाबत सुरू असलेली बदनामी मानसिक खच्चीकरण करत असल्याचं कारण देत डॉक्टरांनी काही काळ काम बंद करण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली. दरम्यान डॉक्टरांच्या संघटनांनी सुरू केलेली ही मुजोरी योग्य नसल्याचे सांगत नियमांचा भंग केल्यास आणि रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवल्यास थेट कारवाई करू, असा इशारा महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी डॉक्टरांच्या संघटनेला दिलाय.

डॉक्टरांच्या संघटना असलेल्या आयएमएनदेखील पाठिंबा दिलेला नाही

शहरातील हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन घेतलेल्या या निर्णयाला खुद्द डॉक्टरांच्या संघटना असलेल्या आयएमएनदेखील पाठिंबा दिलेला नाही. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते ऑपरेशन हॉस्पिटल नावाने चळवळ चालवत असून, यामध्ये हॉस्पिटल कशा पद्धतीने अवास्तव बिल आकारून रुग्णांना वेठीस धरत आहे, याचं फेसबुक लाईव्ह केलं जात आहेत. याव्यतिरिक्त महापालिकेच्या माध्यमातून देखील खासगी हॉस्पिटलच्या मनमानीला चाप लावण्याचा प्रयत्न केला जातोय. यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन काम बंदच अस्त्र उगारले याची चर्चा आहे. मात्र प्रशासनाने देखील अशा आगाऊपणा करणार्‍या डॉक्टरांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिल्याने हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घूमजाव करत सेवा पूर्ववत करण्याचं आश्वासन आयुक्तांना दिलंय.

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठा गुरुवारी संध्याकाळी बंद, तर शुक्रवारी विस्कळीत राहणार

दिलासादायक! राज्यात आज 15,169 नव्या रुग्णांची नोंद, 285 कोरोनाबाधितांचा मृत्यू

Nashik Municipal Commissioner action, doctors of private hospitals start admitting corona patients

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.