Nashik Election|नाशिकमध्ये 500 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करण्याच्या हालचाली; भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

मुख्यमंत्री मुंबईसाठी घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेऊ शकतात, तर नाशिकसाठीही ते पुढाकार घेतील म्हणत महापौर सतीश कुलकर्णी यांनी कोंडीत पकडले आहे. यावर विरोधक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Nashik Election|नाशिकमध्ये 500 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करण्याच्या हालचाली; भाजपची शिवसेनेवर कुरघोडी
Nashik Municipal Corporation.
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 10:14 AM

नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईप्रमाणेच नाशिकमध्ये चक्क 500 फुटापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली अतिशय वेगाने सुरू आहेत. यााबाबत महापौर सतीश कुलकर्णी आज महापालिका आयुक्तांना पत्र देणार आहेत. विशेष म्हणजे येणाऱ्या महासभेत त्यावर प्रस्ताव सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत काय झाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना मुंबईकरांना मोठे गिफ्ट दिले आहे. शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जनतेसमोर लाईव्ह आले. नगरविकास खात्याची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा केली. आता तोच कित्ता नाशिकमध्ये गिरवण्याचा प्रयत्न सुरू झालेले दिसतायत.

मुख्यमंत्र्यांना पकडले कोंडीत

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. शिवसेनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आता भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा लोकप्रिय निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मुख्यमंत्री मुंबईसाठी असा निर्णय घेऊ शकतात, तर नाशिकसाठीही ते पुढाकार घेतील म्हणत महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्यांना कोंडीत पकडले आहे. यावर विरोधक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

उत्पन्नाचे प्रमुख साधन

नाशिक महापालिकेने 2021-22 आर्थिक वर्षात घरपट्टीतून 150 कोटींची वसुली करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 107 कोटींची वसुली झालीय. त्यात मागील थकबाकी 400 कोटींवर गेलीय. नाशिक महापालिका हद्दीत 4 लाख 55 हजार मिळकतीयत. त्यात पाचशे चौरस फुटापर्यंत बहुतांश मध्यवर्गीय आहेत. मात्र, एकीकडे नाशिक महापालिकेची जकात रद्द झाल्यानंतर घरपट्टी हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. तीच रद्द केल्यानंतर कसे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

निवडणुकीच्या तोंडावर

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपने महापालिकेत 2632 पदांवर नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या महासभेत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात पालिकेची निवडणूक आहे. त्यापूर्वी भाजपने विविध विकासकामांसाठीही जोर लावला आहे. त्यावरही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून लांगुलचालन सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. सोबतच विरोधकांनी आस्थापना खर्च, सेवा प्रवेश नियमावली याबाबत प्रश्न निर्माण केला आहे.

राजकीय गणिते

नाशिकमध्ये फेब्रुवारीत महापालिकेची निवडणूक होत आहे. यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद सत्ता काबीज केली. महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. आता फेब्रुवारी महिन्यात होणारी नाशिक महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्यात येत आहे. त्या दृष्टीने सत्ताधारी भाजपची पावले पडत आहेत.

इतर बातम्याः

Nashik|पाचवीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; महिन्यातील दुसरी घटना, नेमके कारण काय?

अस्पृश्यता निवारणाचे शिलेदार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अफाट कार्याचे स्मृतिदिनी स्मरण!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.