Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 59 अर्ज; कशी रंगलीय निवडणूक?
या जागांसाठी 10 जानेवारी दुपारी 3 पर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. येथे 18 जानेवारी रोजी मतदान होईल आणि निकाल 19 जानेवारी रोजी लागेल.
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 59 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या ठिकाणी आता खुल्या प्रवर्गातून निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील निफाड, देवळा, कळवण आणि दिंडोरी नगरपंचायीतील या जागा आहेत. त्यात देवळ्यातील 4 जागांसाठी 27 अर्ज आहेत. निफाडमधील 3 जागांसाठी 14, दिंडोरी व कळवणमध्ये प्रत्येकी 2 जागांसाठी अनुक्रमे 12 व 6 अर्ज आले आहेत. या अर्जांची मंगळवारी सकाळी छाननी होईल. 10 जानेवारी दुपारी 3 पर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या जागांचे 18 जानेवारी रोजी मतदान होईल आणि निकाल मात्र 19 जानेवारी रोजी लागेल.
87 जागांसाठी झाले मतदान
नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी मंगळवारी, 21 डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या नगरपंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे. सुरगाणा आणि पेठ नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व 17 जागांवर निवडणूक होत आहे. निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतीत 14 जागांवर मतदान झाले. देवळा येथे फक्त 11 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी 5 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. या निवडणुकीत एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील एकेका उमेदवाराचा समावेश आहे.
दिंडोरीत 52 उमेदवार रिंगणात
दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे.
देवळ्यात 33 जणांमध्ये सामना
पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जणांमध्ये निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होणार आहे. या सर्व ठिकाणचा निकाल 19 जानेवारी रोजी लागणार आहे.
इतर बातम्याः
Nashik Corona|नाशिकमध्ये किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा धडाका; तर वाढत्या संसर्गाने पुन्हा धडकी
Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोना निर्बंध वाढले; लग्नासाठी आता 50 वऱ्हाडी, जाणून घ्या नवे नियम…