Nashik| सामाजिक कार्यकर्त्या, महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्ष साधना तोरणे यांचे निधन

समाजकार्यात शेवटपर्यंत धडपडणाऱ्या एका झुंजार नेतृत्वाच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत आहे. साधना तोरणे यांचे काम कायम स्मरणात राहील.

Nashik| सामाजिक कार्यकर्त्या, महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्ष साधना तोरणे यांचे निधन
Sadhana Torne
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 10:01 AM

नाशिकः सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्ष सौ. साधना सुधाकर तोरणे (Sadhana Torne) यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. साधनाताईंनी आपले सारे आयुष्य समाजकार्यात खर्ची घातले. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्या उच्च विद्याविभूषित होत्या.

मराठीच्या प्राध्यापिका

साधना तोरणे या मराठीच्या प्राध्यापिका होत्या. मुंबई, पुण्यात त्यांनी अनेक वर्षे ज्ञानदान केले. त्या स्वतःही उच्च विद्याविभूषित होत्या. त्यांनी डबल एम.ए. केले होते. बी.एड. ज्योतिष शास्त्री, डेफ अँड डंबची पदवी असे त्यांचे शिक्षण झाले होते. पुणे, नाशिक येथील विविध समाजसेवी संस्थामध्ये त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केले. तेजस्विनी महिला संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या.

महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार

महिला हक्क संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी त्यांनी आपल्या कामाची मोहर उमटवली. त्यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या समाजकार्यासाठी असलेल्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. साधनाताईंनी महिला सबलीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यांनी विपुल लेखन केले आहे. सातत्याने वृत्तपत्रीय लेखनही सुरू होते.

बालनाट्य दिग्दर्शिका

बालनाट्याच्या दिग्दर्शिका म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. त्यांचे बहुआयामी नेतृत्व होते. आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या गोविंद नगर, नाशिक येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघेल. त्या महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे निवृत्त संचालक सुधाकर तोरणे यांच्या पत्नी, तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांच्या मातोश्री होत्या.

झुंजार नेतृत्व हरपले

साधनाताईंच्या निधनाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. समाजकार्यात शेवटपर्यंत धडपडणाऱ्या एका झुंजार नेतृत्वाच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे काम कायम स्मरणात राहील. त्यांनी प्राध्यापक म्हणून घडविलेले विद्यार्थी राज्यभर आहेत. त्यांच्या जाण्याने नाशिककरांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.

सामाजिक कार्यकर्तेपण जपले

-साधना तोरणे मराठीच्या प्राध्यापिका.

-सामाजिक कार्यामध्ये रमल्या.

-महिला हक्क संरक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविले.

-महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराने गौरव.

-साधनाताईंना इतर अनेक पुरस्कार मिळाले.

-साधनाताईंनी विपुल लेखन केले.

-बालनाट्य दिग्दर्शिका ही वेगळी ओळख.

इतर बातम्याः

Health University|आरोग्य विद्यापीठात यावर्षी 7 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम होणार सुरू; 670 कोटींचा प्रकल्प

Nashik Train|आनंदवार्ता: नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू 10 जानेवारीपासून होणार सुरू

Nashik|नाशिक जिल्ह्यात 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर, काय आहे योजना?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.