Nashik Train|आनंदवार्ता: नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू 10 जानेवारीपासून होणार सुरू

नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू ही रेल्वे गाडी आठ डब्यांची असणार आहे. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून सकाळी 7 वाजता मार्गस्थ होईल.

Nashik Train|आनंदवार्ता: नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू 10 जानेवारीपासून होणार सुरू
Train
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 4:05 PM

नाशिकः नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी. नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेस (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) ही 8 डब्यांची रेल्वे येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. खरे तर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात अनेक कामांसाठी रेल्वेने मेगाब्लॉक घेतला. त्यामुळे नाशिक-मनमाड मार्गावरच्या तब्बल 18 गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला होता. मात्र, या नव्या रेल्वेच्या बातमीने या मार्गावारील प्रवाशांचे चेहरे उजळले आहेत.

असा आहे मार्ग

नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू ही रेल्वे गाडी आठ डब्यांची असणार आहे. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून सकाळी 7 वाजता मार्गस्थ होईल. त्यानंतर 7.26 ला जळगाव, 10.09 वाजता चाळीसगाव, 12.08 वाजता मनमाड, 01.23 वाजता नाशिक आणि त्यानंतर साधारणतः दुपारी 3 सुमारास ही गाडी इगतपुरी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात सकाळी सव्वानऊ वाजता ही गाडी इगतपुरी येथून निघणार आहे. तर भुसावळवला ही गाडी सायंकाळी 05.10 वाजता पोहचेल, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

नाशिक-कल्याण कधी?

नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होणार म्हणून चर्चेत असणारी नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवा कधी सुरू होणार, अशी विचारणा आता नागरिकांमधून होत आहे. या रेल्वे सेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे. आता महापालिका निवडणुकीपूर्वी तरी ही लोकल सुरू होते का, याची साऱ्यांना उत्सुकता आहे.

प्रवाशांमध्ये संताप

नाशिक मार्गावरच्या अठरा रेल्वे येत्या 9 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिक आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कारण एकीकडे एसटी बंद आहेत. दुसरीकडे महत्त्वाच्या रेल्वे बंद झाल्याने प्रवास करायचा तरी करा, असा सवाल निर्माण होत आहे. मुंबईत कळवा-दिवा दरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे तपोवन, पंचवटी, नंदीग्राम, जनशताब्दी या गाड्यांसह मनमाड-नाशिक मार्गावरच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगाब्लॉकमुळे ऐन नव्या वर्षाची सुरुवात अशी नन्नाच्या पाढ्याने झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे.

इतर बातम्याः

Nashik Crime| 16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा; शासनालाही 51 कोटींचा चुना, नेमका घोटाळा काय?

Nashik|नाशिक जिल्ह्यात 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर, काय आहे योजना?

Gold Price|ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना…भावात चक्क 600 रुपयांची घसरण, चांदीही 60 हजारांखाली!

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.