Nashik Water | नाशिकमध्ये गुरुवारी निर्जळी; शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा!

नाशिक-पंचवटी गावठाणात पाणीपुरवठा करण्यासाठी असलेली योजना रद्द करण्यात आली आहे. आता नव्या वर्षात स्काडा पद्धती आणण्यासाठी आयुक्तांनी पावले उचलली आहेत.

Nashik Water | नाशिकमध्ये गुरुवारी निर्जळी; शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 9:48 AM

नाशिकः हिवाळ्यात थंडीने कुडकुडणाऱ्या नाशिककरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. नाशिक शहरामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा (water supply) होणार नसल्याने नागरिकांना निर्जळीला सामोरे जावे लागेल. शिवाय शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या पाण्याचे नियोजन आत्तापासूनच करून ठेवा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या गंगापूर आणि मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम काढण्यात आले आहे. त्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती

नाशिकमध्ये गुरुवारी गंगापूर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशनच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. मीटरिंग क्बुबिकल, एचटी व एलटी ट्रान्सफॉर्मर यासह विविध उपकरणे बदलण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. सोबतच मुकळे धरण विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून जाणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या काळात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 21 जानेवारी रोजीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यानंतर शनिवारपासून सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

येथे मिळेल 24 तास पाणी

नाशिकमध्ये पाण्याची काही कमतरता नाही. यंदा तर पावसाने कहर केला. दिवाळीपर्यंत त्याचे थैमान सुरू असल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. मात्र, इतके असूनही नाशिक-पंचवटीच्या गावठाण भागामध्ये म्हणजेच जुन्या नाशिकमध्ये नेहमी पाणी टंचाई जाणवते. त्याचे कारण म्हणजे इथे चोवीस तास पाणीपुरवठा होत नाही. हे पाहता महापालिका आयुक्त कैलास जाधव सक्रिय झाले आहेत. त्यांनी या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी स्काडाचा प्रयोग राबविण्याची निर्णय घेतल्याचे समजते. या प्रयोगाने गावठाणात पाणी मोजणीचा मार्गही मोकळा होणार आहे.

मोजून देणार पाणी

नाशिक-पंचवटी गावठाणात पाणीपुरवठा करण्यासाठी असलेली योजना रद्द करण्यात आली आहे. आता नव्या वर्षात स्काडा पद्धती आणण्यासाठी आयुक्तांनी पावले उचलली आहेत. त्यामुळे धरणातून थेट पाण्याच्या टाकीपर्यंत जाणाऱ्या पाण्याची मोजणी करणे सोपे होणार आहे. खरेतर पाण्याची अचूक मोजणी करण्यासाठी म्हणूनच स्काडा सिस्टीमसाठी दोन वर्षांपूर्वी निविदा काढली. मात्र, त्यातील अटी, शर्थीत अनेक बदल झाले. हे सारे संशयास्पद वाटल्याने त्या निविदा रद्द करण्यात आल्या. आता त्यानंतर पुन्हा एकदा स्काडा सिस्टीम राबवण्यात येणार आहे. त्याचा फायदा नाशिक आणि पंचवटी गावठाणाला होऊन तिथे चोवीस तास पाणी मिळेल.

इतर बातम्याः

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Nashik Jobs : घरबसल्या नोकरी मिळवा; नाशिकमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा, कसे व्हाल सहभागी?

Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात 16 कोविड सेंटर सुरू; कुठे मिळतायत उपचार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.