AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदवार्ताः नाशिकमध्ये नोकरीच्या 227 संधी; 27 सप्टेंबरपासून ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

नाशिक जिह्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक खूशखबर. जिल्ह्यात सध्या 227 नोकरीच्या संधी असून, त्यासाठी येत्या 27 सप्टेंबरपासून ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आनंदवार्ताः नाशिकमध्ये नोकरीच्या 227 संधी; 27 सप्टेंबरपासून ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन
job
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 2:03 PM
Share

नाशिकः नाशिक जिह्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक खूशखबर. जिल्ह्यात सध्या 227 नोकरीच्या संधी असून, त्यासाठी येत्या 27 सप्टेंबरपासून ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (227 job opportunities in Nashik; Online job fair from 27th September)

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राकडून या दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील उद्योग समूह सहभागी होत आहेत. नाशिकच्या डब्ल्यूएनएस ग्लोबस सर्व्हिसेसमध्ये अप्रेंटिसच्या 10 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी कुठल्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. नाशिकच्याच श्रद्धा मोटर इंडस्ट्री प्लांटमध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यात 2 फीटर, 8 वेल्डर आणि 1 जागा इलेक्ट्रीशियनची आहे. नाशिकच्या डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस बी. कॉम आणि बीबीए उत्तीर्ण उमेदावारांसाठी 100 नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, तर एमबीएच्या 100 जागीही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच इतरही काही रोजगाराच्या संधी आहेत.

असा भरा अर्ज

ऑनलाइन रोजगार मेळाव्यातील नोकरीची संधी मिळवण्यासाठी संबंधित उमेदवाराची सेवायोजन कार्यालयामध्ये नोंदणी असणे गरजेचे आहे. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या वेबपोर्टलवर लॉग इन करावे. त्यानंतर जॉब फेअर टॅबरवर क्लिक करावे. यात NASHIK ONLINE JOB FAIR-6 (2021-22) या भागाची निवड करावी. या भागात उमेदवाराने आपल्या पात्रतेप्रमाणे रिक्त जागांसाठी अर्ज करावा. काही अडचण आल्यास 0253-2972121 या क्रमांकावर कार्यालय वेळेत संपर्क साधावा. रोजगार मेळाव्याच्या ऑनलाइन मुलाखतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सेवायोजन विभागाचे सहायक आयुक्त अ. ला. तडवी यांनी केले आहे.

दुपारी तीन वाजता ऑनलाइन मार्गदर्शन

नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आज शुक्रवारी दुपारी तीन वाजता ऑनलाइन मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘वाइन स्पिरीट व हॉस्पिटलायझेशनमध्ये रोजगार संधी’ या विषयावर NashikSkill या फेसबुक पेजवरून हे मार्गदर्शन केले जाणार आहे. सोबतच अर्ज केल्यानंतर सर्व मुलाखती या व्हिडिओ कॉन्फरन्स, मोबाइल व दूरध्वनीद्वारे घेण्यात येणार आहेत.

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले

कोरोनामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांच्या नोकऱ्या व रोजगार गेले आहेत. विविध कंपन्यांनी उत्पादनात कपात झाल्यामुळे कर्मचारी वर्ग कमी तरी केला किंवा त्यांना काही दिवसांच्या सुट्टीवर पाठवले होते. आता कोरोनाची तिसरी लाट यायची शक्यता कमी दिसते आहे. कोरोना रुग्णही आटोक्यात आहेत. त्यामुळे कंपन्यांचे गाडे रुळावर आले असून, पुन्हा एकदा नोकर भरती सुरू झाली आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. (227 job opportunities in Nashik; Online job fair from 27th September)

इतर बातम्याः

नाशिकच्या एंजलचा भीमपराक्रम; खवळलेल्या समुद्राशी झुंज देत 14 तास 23 मिनिटांत 45.1 किमीची इंग्लिश खाडी पार

महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच नाशिकमध्ये मारहाण

नाशिकः मध्यरात्री दीड वाजता कामावर न आल्याने तिघांनी आवळला गळा; मृतदेह फेकला विहिरीत

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.