धोक्याची घंटा…नाशिक जिल्ह्यात 961 कोरोना रुग्ण…एकट्या सिन्नरमध्ये 278

नाशिक (Nashik) जिल्ह्यामध्ये मंगळवारी (21 सप्टेंबर) 961 कोरोना (corona) रुग्ण आढळले. त्यात एकट्या सिन्नरचा आकडा 278 रुग्णांचा असल्याने तूर्तास भीती वाढली आहे.

धोक्याची घंटा...नाशिक जिल्ह्यात 961 कोरोना रुग्ण...एकट्या सिन्नरमध्ये 278
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 6:50 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यामध्ये मंगळवारी (21 सप्टेंबर) 961 कोरोना (corona) रुग्ण आढळले. त्यात एकट्या सिन्नरचा आकडा 278 रुग्णांचा असल्याने तूर्तास भीती वाढली आहे. (961 corona patients in Nashik district, 278 in Sinnar alone)

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि निफाडमधील रुग्ण वाढत असल्याने ही दोन्ही ठिकाणे हॉटस्पॉट ठरत आहेत. सिन्नर आणि नगरची सीमारेषा जवळ आहे. यामुळे या भागात रुग्ण वाढत असल्याची शक्यता आहे. नगरमध्ये झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. ते पाहता नाशिकमध्ये लक्ष ठेवावे. येथे कोरोना चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या आहेत. कुंटे यांनी नाशिक, नगर, पुणे, ठाणे, सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, अजूनही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी 961 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात महापालिका क्षेत्रातील 265 तर ग्रामीण भागातील 672 रुग्णांचा समावेश आहे. यात सर्वात जास्त रुग्ण संख्या सिन्नरमध्ये 278 असून, त्या खालोखाल निफाडमध्ये 159 आहे.

लसीकरण सुसाट

नागरिकांची जागरुकता आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारा लससाठा यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा वारू चौखुर उधळून डोसचा आकडा हा तब्बल 25 लाखांच्या घरात गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 24 लाख 74 हजार 722 जणांनी लस घेतली आहे. यातील लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 18 लाख 31 हजार 204 आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 6 लाख 43 हजार 518 आहे.

तूर्तास शाळा बंदच

नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडतच आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. ज्या गावांमध्ये एक महिन्यापर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही, त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र, जिल्ह्यात तूर्तास तरी अशी स्थिती असल्याचे दिसत नाही.

नियमांना हरताळ

सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लससाठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांना अक्षरशः हरताळ फासला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. पंचवटी, रामकुंड, शालीमार, अशोकस्तंभ, मुंबई नाका, नाशिकरोड, अशोकामार्ग, गंगापूररोड, महात्मानगर, दीपालीनगर, इंदिरानगरसह सर्वच भागात कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. विशेषतः बहुतांश जण मास्क वापरत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली, तर आटोक्यात आणणे मोठे आव्हान असणार आहे. (961 corona patients in Nashik district, 278 in Sinnar alone)

इतर बातम्याः

कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यास मागता येईल दाद; पोलिसांविरुद्धच्या तक्रारीसाठी नाशिकमध्ये प्राधिकरण

नाशिकच्या खमक्या पाटलांची बदली अखेर रद्द; जिल्हा पोलीस अधीक्षकपदीच राहणार, ‘त्या’ आमदाराच्या पत्राची मात्र जोरदार चर्चा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.