अजित पवार यांनी आता कुणाला ‘डोळा’ मारला? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा डोळा मारला आहे. त्यांचा डोळा मारल्याचा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अजित दादांनी नेमका आता कुणाला डोळा मारलाय? असा प्रश्न आता चर्चेत आहे.

अजित पवार यांनी आता कुणाला 'डोळा' मारला? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 5:54 PM

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या डोळा मारल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांचा डोळा मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर डोळे मारण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील अजित पवार यांनी डोळा मारल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. त्यानंतर आज पुन्हा नाशिकमधील पत्रकार परिषदेत त्यांनी डोळा मारला. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार यांच्या नाशिक येथील पत्रकार परिषदेत आज अनोखा प्रकार बघायला मिळेल. चिन्ह तुम्हाला मिळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. यावेळी उत्तर देताना अजित पवार यांनी डोळा मारला. अजित पवार यांची ती उत्सफुर्त प्रतिक्रिया होती. पण त्यांनी तो डोळा नेमका कुणाला मारला? यावरुन पुन्हा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार यांना चिन्ह तुम्हाला मिळेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी चिन्ह कुणाला मिळेल हे आगामी काळात दिसेल असं उत्तर अजित पवारांनी दिलं. हे उत्तर दिल्यानंतर अजित पवार यांनी डोळादेखील मारला. मात्र अजित दादांनी डोळा नेमका कुणाला मारला? अशी चर्चा आता रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार डोळा मारण्याआधी नेमकं काय म्हणाले?

“तुम्ही काही काळजी करु नका. तुम्ही का काळजी करता? स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका किंवा कुठल्याही निवडणुकांवेळी चिन्ह आणि एबी फॉर्म द्यावा लागतो. तोपर्यंत सर्व गोष्टींचा तुमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल”, असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर त्यांनी डोळा मारला.

याआधीदेखील अजित दादांच्या डोळे मारल्याची चर्चा

शिंदे-फडणवीस सरकारने मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका केली होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधान भवन परिसरात विरोधी पक्षांची पत्रकार परिषद पार पडली होती. सुरुवातीला अजित पवार आपली भूमिका माध्यमांसमोर मांडत होते. त्यानंतर उद्धव ठाकरे पुढे आले.

अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना प्रसारमाध्यमांसमोर जाण्यासाठी जागा दिली. ते बाजूला झाले आणि उद्धव ठाकरे माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आले.उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर त्यावेळी टीका करत होते. यावेळी अजित पवार यांनी डोळा मारला होता. अजित पवार यांचा डोळा मारल्याचा तो प्रसंग देखील कॅमेऱ्यात कैद झाला होता.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.