अजितदादा सिल्व्हर ओकवर येताच शरद पवार यांनी दिलं पत्र, काय आहे पत्रात?; अजित पवार यांनी सांगितलं काय घडलं?

शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा फोटो माझ्या दालनात आहे. तुम्ही काही काळजी करू नका, असं त्यांनी सांगितलं. तसेच सर्वांच्या आमदारकी राहतील. सरकार चालेल. राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी जीवापाड मेहनत करू. तो पक्ष सर्वदूर नेऊ, असंही ते म्हणाले.

अजितदादा सिल्व्हर ओकवर येताच शरद पवार यांनी दिलं पत्र, काय आहे पत्रात?; अजित पवार यांनी सांगितलं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 11:40 AM

चैतन्य मनिषा अशोक, नाशिक, दिनांक 15 जुलै 2023 : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर सर्जरी करण्यात आल्यामुळे अजित पवार सिल्व्हर ओकवर आले होते. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळेही उपस्थित होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच सिल्व्हर ओकवर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार अर्धातास सिल्व्हर ओकवर होते. यावेळी शरद पवार यांनी त्यांना एक पत्र दिलं. ते पत्र कशासाठी होतं? काय होतं? याची माहिती अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. काकींवर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे काकींना भेटण्यासाठी दुपारीच जायचं होतं. पण विलंब लागला. विधानसभा अध्यक्षांना भेटायचं होतं. त्यातच खाते वाटप झाला. त्यामुळे तिथे वेळ गेला. त्यानंतर काम झाल्यावर मी सुप्रियाला फोन केला. तिने सांगितलं दादा आम्ही सिल्व्हर ओकवर चाललोय. तुझं काम झाल्यावर तिकडेच ये. म्हणून तिकडे गेलो, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अंतर्मन म्हणालं…

मला काकूला भेटायचंच होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. शेवटी आपली वर्षानुवर्ष भारतीय संस्कृती आहे. परंपरा आहे. कुटुंबाला आपण महत्त्व देतो. आजी-आजोबा, आई-वडील आणि काका-काकूंनी आम्हाला पवार कुटुंबीयांची परंपरा शिकवली आहे. त्यामुळे काकींना भेटलो. अर्धा तास भेटलो. तब्येतीची विचारपूस केली. खुशाली विचारली.

त्यांना 21 दिवस काळजी घ्यायला सांगितलं आहे. माझ्या अंतर्मनाने सांगितलं म्हणून सिल्व्हर ओकवर गेलो. घरी शरद पवार साहेब होते. काकी होती, सुप्रिया तिथे होती. तुम्हाला काय अडचण आहे? पवार साहेबांचं घर आहे तर ते घरी राहणारच. मी साडे आठला गेलो होतो. काकीपण होत्या. त्या आजारी होत्या, सुप्रियाही होती, असं त्यांनी सांगितलं.

पत्र कशाबाबतचं?

यावेळी सिल्व्हर ओकवर राजकीय चर्चा झाली नाही. पण शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना शिक्षणाबाबतचं एक पत्र दिलं. एक पत्र फडणवीस यांना दिलं. एक पत्र मलाही दिलं. पत्र आल्या आल्या मी कालच अधिकाऱ्यांना सांगितलं. शिक्षण विभागाला माहिती घ्यायला सांगितलं आहे. मला सोमवारी माहिती मिळेल. 2021-22 बाबतच्या निर्णया संदर्भातील पत्र आहे.

सरकार कुणाचं होतं हे महत्त्वाचं नाही. आज आपला नंबर शिक्षणात सातवा गेला आहे. त्या निर्णयाप्रमाणे. हा मुलामुलींचा पाया आहे, 30 हजार शिक्षकांची भरती करणार आहे. जिथं जिथं जागा रिक्त असेल आणि भरायची गरज असेल तर त्या भरणार. ती पोलीसची भरती असेल किंवा शिक्षकांची ती करू. मेरीटमध्ये करू, असंही त्यांनी सांगितलं.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.