विकास ही न थांबणारी प्रक्रिया, आपत्तीकाळातही विकासकामे सुरूच; भुजबळांच्या हस्ते नाशकातील विकासकामांचे भूमीपूज

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला मतदारसंघात निफाड तालुक्यातील ब्राम्हणगांव विंचूर व मुखेड येथे एकूण 1 कोटी 92 लाखांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन पार पडले.

विकास ही न थांबणारी प्रक्रिया, आपत्तीकाळातही विकासकामे सुरूच; भुजबळांच्या हस्ते नाशकातील विकासकामांचे भूमीपूज
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 8:10 PM

नाशिक : विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अनेक आपत्तीचा सामना करत शासन आपल्या स्तरावर विविध विकासांची काम करीत असते. कोरोनासारखे संकट किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळातही विकासकामे सुरू ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करीत आहोत. अशा परिस्थीतीतही न थाबंता विकासकामे या पुढेही नियमित सुरू राहतील, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला मतदारसंघात निफाड तालुक्यातील ब्राम्हणगांव विंचूर व मुखेड येथे एकूण 1 कोटी 92 लाखांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन पार पडले. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, साहेबराव मढवई, सरपंच भारती मंगेश गवळी, मंगेश गवळी, पंचायत समिती सदस्य शिवाजी सुरासे, हरिश्चंद्र भवर, गुणवंत होळकर, बाजार समितीचे संचालक अशोक गवळी, ललित दरेकर, पांडुरंग राऊत, दत्तात्रय रायते, विनोद जोशी, ज्ञानेश्वर शेवाळे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ, प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, कार्यकारी अभियंता संजय नारखेडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, उपअभियंता व्ही. के. पाटील, यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे विकासकामे काही काळ थांबली होती. परंतू आता पुन्हा एकदा विकासाची कामे सुरू झाली असून रखडलेली सर्व कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या विकास कामासाठी लागणारा आवश्यक निधी शासनस्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोळागाव पाणी पुरवठा योजनेबाबत पाणी पुरवठा मंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येवून, हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच शिवनदी स्वच्छतेबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून हा प्रश्नदेखील मार्गी लागेल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. नाशिक जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पाच पट ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळी प्रथमतः नागरिकांचे जीव वाचविण्यास शासनाने प्राधान्य दिले असून, नागरिकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी व कोरोनाच्या सर्व नियमावलीचे पालन करून प्रत्येकाने आपले कुटुंब सुरक्षित राहील याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

या कामांचा शुभारंभ करण्यात आला

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ब्राम्हणगाव विंचूर येथे मुलभूत सुविधा योजनेंतर्गत हनुमान मंदिरासमोरील सभागृह, हनुमान मंदिर परिसर पेव्हर ब्लॉक, महादेव परिसर चौक कॉक्रिटीकरण, गावांतर्गत सिमेंट रस्ते, अल्पसंख्यांक वस्ती विकास योजनेंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण, अंगणवाडी क्र.160 व अंगणवाडी क्र. 161 या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच मुलभूत सुविधा योजनेंतर्गत गावांतर्गत सिमेंट रस्ते, आमदारांचा स्थायनिक निधी अंतर्गत सभामंडप बांधणे, जिल्हा क्रिडा योजनेंतर्गत व्यायाम शाळा इमारत बांधणे, आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत सभामंडप बांधणे, जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमी अनुषंगिक कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर मुखेडफाटा ता. येवला येथे जऊळके ते प्ररामा 2 रस्ता सुधारणा करणे या कामाचे भुमीपूजन करण्यात आले.

इतर बातम्या

शुद्धीकरणसाठी ब्राह्मण लागतो, आम्हाला मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत; राणेंचा शिवसेनाला खोचक टोला

राज्यपाल म्हणाले, 12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकारचा आग्रह नाही; अजितदादा म्हणतात, मुख्यमंत्री आणि मी त्यांना पुन्हा भेटणार

पवार म्हणाले, जेवायचं निमंत्रण दिलं, पण हातपाय बांधले; राणे म्हणतात, परिपक्व राजकारणी आहात, हात सोडवून घ्या

(Bhumi Puja of development works in Nashik by Chhagan Bhujbal)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.