मंदिर यही खुलवायेंगे… जन्माष्टमीपासून राज्यातील प्रमुख मंदिरांबाहेर आंदोलन करणार; भाजपच्या अध्यात्मिक आघाडीची घोषणा

राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने मंदिर यही खुलवायेंगेचा नारा दिला आहे. तसेच कृष्ण जन्माष्टमीपासून राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. (BJP 'Adhyatmik Aghadi' has called for agitation against the state government)

मंदिर यही खुलवायेंगे... जन्माष्टमीपासून राज्यातील प्रमुख मंदिरांबाहेर आंदोलन करणार; भाजपच्या अध्यात्मिक आघाडीची घोषणा
tushar bhosle
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 11:27 AM

नाशिक: राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने मंदिर यही खुलवायेंगेचा नारा दिला आहे. तसेच कृष्ण जन्माष्टमीपासून राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणाच भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने केली आहे. (BJP ‘Adhyatmik Aghadi’ has called for agitation against the state government)

भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यंनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील मंदिरे ठाकरे सरकारने बंद केली आहेत. सत्तेच्या नशेत गुंग असलेलं हे सरकार आहे. सरकारच्या या धोरणामुळे मंदिरावरच पोट असलेल्यांची सध्या उपासमार होत आहे. सरकार त्यांना मदत देखील देत नाही. मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आर्थिक पॅकेज का नाही?, असा सवाल करतानाच त्यामुळेच ठाकरे सरकार विरोधात रणशनिंग फुंकण्याची वेळ आली आहे, असं तुषार भोसले म्हणाले.

फक्त मंदिरांमुळेच तिसरी लाट येणार काय?

राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात यावीत या मागणीसाठी जन्माष्टमीपासून राज्यातील मंदिरांबाहेर आंदोलन करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांबाहेर आंदोलन करण्यात येणार आहेत, असं सांगतानाच तिसऱ्या लाटेचा धोका फक्त मंदिरांमुळेच येतोय का?, असा सवाल त्यांनी केला.

भाजप नेतेही सहभागी होणार

मंदिर यही खुलवायेंगे हा आमचा आता नवा नारा असणार आहे. भाजपाचे वरिष्ठ आणि प्रमुख नेतेही या आंदोलनात सहभागी होतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याबाबतची सविस्तर माहिती देतील, असं त्यांनी सांगितलं. (BJP ‘Adhyatmik Aghadi’ has called for agitation against the state government)

संबंधित बातम्या:

‘रडने का नही, भिडने का’, चित्रा वाघ पारनेरच्या महिला तहसिलदारांच्या भेटीला

जातीनिहाय जनगणनेसाठी बिहारमधील सत्ताधारी एकवटले; रोहित पवार म्हणाले..

राणेंची संभाजी महाराजांशी तुलना, शिवसेना आमदाराची प्रमोद जठारांविरोधात तक्रार; अटक होणार?

(BJP ‘Adhyatmik Aghadi’ has called for agitation against the state government)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.