AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकच्या सिडको परिसरात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह; घातपाताचा संशय

नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या सिहंस्थनगरमध्ये एका दुकानासमोर अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, तर्क वितर्कांना उधान  आले आहे.

नाशिकच्या सिडको परिसरात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह; घातपाताचा संशय
माथेरानमध्ये हत्या झालेल्या महिलेची ओळख पटली
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 7:09 AM
Share

नाशिक: शहरातील सिडको परिसरात असलेल्या सिहंस्थनगरमध्ये एका दुकानासमोर अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, तर्क वितर्कांना उधान  आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या तरुणाची ओळख अद्याप पटली नसून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घातपाताचा संशय

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सिडको परिसरातील सिहंस्थनगरमध्ये इंडियन ग्लास नावाचे दुकान आहे. याच दुकानासमोर तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचे वय अंदाजे 35 वर्षांच्या आसपास आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून,  ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा घातपाताचा प्रकार असावा अशी चर्चा परिसरातून सुरू आहे.

तरुणाची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

या मृत तरुणाची उंची 5 फूट 2 इंच, अंगात मेंहदी रंगाचा टी शर्ट व राखाडी रंगाची फुल पॅन्ट, अंगाने सडपातळ , रंगाने गोरा , डोळे काळे , नाक सरळ , डोके आणि दाढीचे केस वाढलेले असा बांधा आहे. याबाबत माहिती असल्यास अंबड पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

Mhada Exam: आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपर फुटला, नवी तारीख म्हाडा ठरवणार

Raigad Crime : माथेरानमध्ये आढळला शिर कापलेला महिलेचा मृतदेह, आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Pune crime|सिंहगड कॉलेजमधला २२ वर्षीय विद्यार्थी करायचा हाय टेक चोरी ; चोरीची पद्धत वाचून तुम्ही व्हाल हैराण

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.