Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुन्हेगारांच्या नाड्या आवळणारे पोलीस अधीक्षक पाटील यांच्यासाठी नाशिककर एकवटले

गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ओळख निर्माण करणारे नाशिक ग्रामीणचे पोलीस (Nashik Police) अधीक्षक सचिन पाटील यांची बदली (Cancel the transfer) रद्द करावी, अशी मागणी सामान्यांतून जोर धरत आहे. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, शनिवारी महापालिकेने (Municipal Corporation) हे बॅनर काढून टाकले.

गुन्हेगारांच्या नाड्या आवळणारे पोलीस अधीक्षक पाटील यांच्यासाठी नाशिककर एकवटले
सचिन पाटील
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 6:12 PM

नाशिकः गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ओळख निर्माण करणारे नाशिक ग्रामीणचे पोलीस (Nashik Police) अधीक्षक सचिन पाटील यांची बदली (Cancel the transfer) रद्द करा, अशी मागणी सामान्यांतून जोर धरत आहे. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, शनिवारी महापालिकेने (Municipal Corporation) हे बॅनर काढून टाकले. (Cancel the transfer of Nashik Rural Superintendent of Police Sachin Patil, demand of citizens, banner hoisted in Nashik)

वर्षभरापूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्याकडून सचिन पाटील यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र, एक दिवसापूर्वी त्यांच्या बदलीचा आदेश येऊन धडकला. त्यांंच्या जागी शहाजी उमाप यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुका, आचारसंहिता आणि न्यायालयीन आदेशाप्रमाणे या बदल्या केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सचिन पाटील यांना येऊन फक्त एक वर्ष झाले आहे. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकालही पूर्ण झाला नाही. मग त्यांच्या बदलीचे कारण काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः पाटील यांच्या बदलीने गावागावातील नागरिक नाराज झाला आहे.

काय केली कामगिरी?

नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक म्हणून रुजू होताच पाटील यांनी जोरदार बॅटिंग केली. जिल्ह्यात रेव्ह पार्ट्या, हुक्का पार्टी, अवैध गुटखा प्रकरणांमध्ये पाटील यांनी केलेली कारवाई गाजली. त्यांनी रोलेट किंगचा पर्दाफाश केला. अवघ्या काही महिन्यांत पाटील यांनी केलेल्या कामगिरीमुळे जनसामान्यांत त्यांची गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओखळ झाली होती. शेतकऱ्यांना फसविणारा व्यापारी वर्ग, रोलेटचा जुगार चालविणारे, भूमाफिया या साऱ्यांना पाठिशी घालणारे राजकारणी यांच्या नाड्या पाटील यांनी आवळल्या होत्या. पाटील यांच्या कार्याकाळात गुन्हाचा छडा लवकर लागत असे. त्यामुळेच त्यांची बदली केल्याचा आरोप होत आहे.

भुजबळांनाही साकडे

पाटील यांची बदली रद्द करावी, यासाठी ‘आम्ही सारे शेतकरी, सामान्य नाशिककर’ मंचतर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना नुकतेच निवेदनही देण्यात आले. त्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सचिन पाटील यांच्या बदलीमागे शेतकऱ्यांना फसविणारी चांडाळ चौकडी, रोलेटचा जुगार चालविणारे, अवैध धंदे चालक, गुटखा आणि रेती, भूमाफिया आहेत. या अवैध प्रवृत्तींना अभय देणारे राजकारणी आहेत. त्यांची बदली रद्द करण्यात यावी.’ (Cancel the transfer of Nashik Rural Superintendent of Police Sachin Patil, demand of citizens, banner hoisted in Nashik)

इतर बातम्याः 

नाशिकमध्ये फक्त वीस रुपयांसाठी कटरने गळा चिरला, अर्ध्या किमीपर्यंत रक्ताचे डाग

नाशिक पालिकेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, 7109 ऑक्सिजन बेड ठेवले सज्ज

हिरव्यागच्च झाडाचा बहर गळून पडला, सुलोचना महानोर यांचे निधन

सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार.
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.