कोरोना लसीविषयी आदिवासींमध्ये गैरसमज आणि भिती, ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी : छगन भुजबळ

कोरोना लसीविषयी आदिवासींमध्ये गैरसमज आणि भिती आहे. त्यामुळे उपचारात अडथळे येत होते. मात्र, त्यावर ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी असल्याचं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.

कोरोना लसीविषयी आदिवासींमध्ये गैरसमज आणि भिती, ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी : छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 4:47 PM

नाशिक : “कोरोनाविषयी असलेले गैरसमज व भीतीमुळे उपचारासाठी आदिवासी बांधव पुढे येत नव्हते. अशावेळी आदिवासी बांधवांचा ज्या उपचार पध्दतीवर विश्वास व उपचार घेण्याची तयारी आहे, अशी आयुर्वेदीक उपचार पध्दती सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात पोहचवून आदिवासी बांधवावर उपचार करण्यात आले. या माध्यमातून कोरोनामुक्तीचा ‘सुरगाणा पॅटर्न’ आदिवासी भागात प्रभावी ठरला आहे,” असं मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ फॉर्म येथे ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वीपणे राबविणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील वैद्यकीय क्षैत्रातील मान्यवरांचा सत्कार जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते (Chhagan Bhujbal praise Surgana Pattern of Corona treatment in Tribal of Nashik).

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, “आदिवासी भागातील बांधवांना कोरोनावरील उपचार व लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करणे खूप कठीण काम होते. परंतू आपली वर्षानुवर्षे चालत असलेली आयुर्वेदीक उपचार पध्दती कोरोना काळात वरदान ठरली आहे. सुरगाण्यात यशस्वी ठरलेल्या सुरगाणा पॅटर्न शासनापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.”

“कोरोनाची लढाई अजून संपलेली नसून हा स्वल्पविराम”

“आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्य. विक्रांत जाधव यांनी मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा केली असून ही बाब अतिशय कौतुकास्पद व समाजाला आदर्श देणारी आहे. कोरोना काळात सुरगाण्या सारख्या आदिवासी भागात सेवा देणारे सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारीका यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. परंतू कोरोनाची लढाई अजून संपलेली नसून हा स्वल्पविराम आहे. पुढे येणाऱ्या नवीन आवाहानासाठी सर्वांनी सज्ज राहून आपले काम सुरु ठेवावे,” असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

“जनजागृती केल्याने अधिक प्रमाणात आदिवासी बांधव लसीकरण व उपचारासाठी पुढे आले”

कोरोनाकाळात लोककलेच्या माध्यमातून आदिवासी बांधवामध्ये जनजागृती केल्याने अधिक प्रमाणात आदिवासी बांधव लसीकरण व उपचारासाठी पुढे येतांना दिसत असल्याचे चित्र समाधानकारक आहे, असे मतही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, सुरगाणा पॅटर्न स्तुत्य उपक्रम आहे. हा उपक्रम आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात आला आहे. सुरगाणा पॅटर्न यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, दैनिक सकाळचे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक राहूल रनाळकर, वैद्य विक्रांत जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी व आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर ‘सुरगाणा पॅटर्न’ यशस्वी करणाऱ्या जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिलिंद चित्तरवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणवीर, डॉ. चैतन्य बैरागी, वैद्यकीय अधिकारी कमलाकर चौधरी, वैद्यकीय अधिकारी योगिता जोपळे, डॉ. राजेश चौधरी, डॉ.सागर पाटील, डॉ. विजय साठे, डॉ.कल्पेश भोये, डॉ.जयेंद्र थविल, सामुदाय आयुष अधिकारी अनिल हिंडे, डॉ.अक्षय पाटील, डॉ.मधुकर पवार, डॉ. विजय देवरे, डॉ.वसंत गावित यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते करण्यात आला.

हेही वाचा :

ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने गरीबांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान द्यावे : छगन भुजबळ

वसंतराव नाईक यांनी खेडयापाड्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळं महाराष्ट्रात कृषी क्रांती : छगन भुजबळ

व्हिडीओ पाहा :

Chhagan Bhujbal praise Surgana Pattern of Corona treatment in Tribal of Nashik

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.