Chhagan Bhujbal on ketaki chitale: पवारांवरील पोस्ट चीड आणणारी, यामागे मनुवाद आहे का?; छगन भुजबळांचा केतकीच्या पोस्टवर सवाल

Chhagan Bhujbal on ketaki chitale: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लहान समाजाचं दुःख त्या कवितेतून मांडलं. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लावून थेट टीका करणं योग्य नाही.

Chhagan Bhujbal on ketaki chitale: पवारांवरील पोस्ट चीड आणणारी, यामागे मनुवाद आहे का?; छगन भुजबळांचा केतकीच्या पोस्टवर सवाल
पवारांवरील पोस्ट चीड आणणारी, यामागे मनुवाद आहे का?; छगन भुजबळांचा केतकीच्या पोस्टवर सवालImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 1:26 PM

नाशिक: अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवरून एकच वाद सुरू झाला आहे. केतकीच्या पोस्टवरून सर्वच स्तरातून तिच्यावर जोरदार टीका होत आहे. शिवसेनेपासून ते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानेही केतकीवर टीका केली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनीही केतकीवर टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवारांवर सोशल मीडियातून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे. अशा लोकांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. अभिनेत्री अथवा कुणीही असो, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे चीड आणणारे आहे. यामागे मनुवाद आहे का? हे तपासलं पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी फेसबुक पोस्टवर संताप व्यक्त करत हा सवाल केला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लहान समाजाचं दुःख त्या कवितेतून मांडलं. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लावून थेट टीका करणं योग्य नाही. पवारांच्या आजारावरही टीका केली आहे. ते चुकीचं आहे. अशा पद्धतीने पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. अशा लोकांना ताबडतोब सोशल मीडियाने कायमस्वरूपी बॅन केलं पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधानांच्या घरी हनुमान चालिसा म्हणावा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आज दिल्लीत हनुमान चालिसाचं पठन केलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नवनीत राणांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्या हनुमान चालिसा पंतप्रधानांच्या घरी जाऊन बोलल्या तरी काही हरकत नाही., वाईट वाटायचं कारण नाही. फक्त त्याचं राजकारण करू नये, भक्तिभावाने हनुमान चालिसा पठण करावा, असा सल्ला त्यांनी राणा यांना दिला.

उद्धव ठाकरेंच्या सभेला शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी दिवसभर काम सुरू केलं आहे. ते अतिशय चांगलं काम करत आहेत. आजच्या उद्धव ठाकरेंच्या सभेला शुभेच्छा आहेत, असं त्यांनी सांगितलं.

देशात सध्या भगव्यांचं राजकारण

महागाई आणि इतर प्रश्न सोडून भगव्याचं राजकारण सध्या देशात सुरू आहे. प्रत्येकाच्या मनात आपआपले देव आहेत. विरोधक याचा राजकारणात वापर करत आहेत. इतर प्रश्न लापवण्यासाठी वापर केला जात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.