‘महाराज, लक्षात ठेवा, छगन भुजबळाला मंत्रिपदाची पर्वा नाही’

"संभाजीराजे म्हणाले की, भुजबळ दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करत आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. संभाजीराजे आम्ही तुमचा आदर, सन्मान करतो. कारण आमच्या हृदयात असलेले शाहू महाराज, जे मागासवर्गीयांना वरती आणण्यासाठी त्यांची बाजू घेऊन लढत होते, ते शाहू महाराज आहेत. त्या शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही आहात", असं छगन भुजबळ म्हणाले.

'महाराज, लक्षात ठेवा, छगन भुजबळाला मंत्रिपदाची पर्वा नाही'
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 3:48 PM

नाशिक | 18 नोव्हेंबर 2023 : ओबीसी नेत्यांची काल जालनाच्या अंबड येथे एल्गार सभा आयोजित करण्यात आलेली. या सभेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं भाषण चर्चेला कारण ठरलं आहे. छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सडकून टीका केली. त्यांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या भाषणावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिलेली. छगन भुजबळ दोन समाजात वितुष्ट निर्माण करत आहेत, अशी भूमिका संभाजीराजेंनी मांडलेली. पण त्यांच्या या भूमिकेवर छगन भुजबळांनी टीका केली. विशेष म्हणजे भुजबळांनी संभाजीराजेंना तुम्ही छत्रपती शाहू महारांजांच्या गादीवर बसला आहात, त्यांचे वंशज आहात, सर्वांना सोबत घेऊन पुढे चाललं पाहिजे, असं म्हणाले. याशिवाय आपल्याला मंत्रिपदाची पर्वा नाही, असंही भुजबळ आक्रमकपणे म्हणाले.

जालन्याची अंबड येथील कालच्या सभेनंतर छगन भुजबळ यांची आज इगतपुरी येथे सभा पार पडली. यावेळी भाषण करताना छगन भुजबळांनी संभाजीराजेंवर निशाणा साधला. “संभाजीराजे म्हणाले की, भुजबळ दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करत आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. संभाजीराजे आम्ही तुमचा आदर, सन्मान करतो. कारण आमच्या हृदयात असलेले शाहू महाराज, जे मागासवर्गीयांना वरती आणण्यासाठी त्यांची बाजू घेऊन लढत होते, ते शाहू महाराज आहेत. त्या शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही आहात. तुम्ही एका समाजाचे नाहीत. तुम्ही या राज्यातील सर्व समाजाचे आहात. तुम्ही एका समाजाची बाचू घेऊन कसं बोलता?”, असा सवाल छगन भुजबळांनी केला.

‘राजे, कुणावरही अन्याय करु नका’

“एकतर तुम्ही या आरक्षणाच्या प्रकरणात यायलाच नकोत. आलात तर सांगितलं पाहिजे की, सर्वांचे अधिकार शाबूत ठेवा. कुणावरही अन्याय करु नका. ही अपेक्षा संभाजीराजेंकडून आम्हाला आहे. घरेदारे कुणी जाळली? मी जाळली? दोन महिने जे घडलं त्यावर मी काही बोललो? घरेदारे जाळली तेव्हा तुम्ही बोलायला हवं होतं. तुमचं काम होतं राजे, नाही असं करु नका रे, असं सांगायला हवं होतं. राजे तुम्ही स्वत: बीडला जायला हवं होतं. जनतेची घरे, दुकानं, हॉटेल जाळण्यात आली. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. तुम्ही त्यांचे अश्रू पुसायला हवे होते. महाराज हे तुमचंही काम नाही का? पण तुम्ही सांगतात, हे भुजबळ करतो”, असं छगन भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले.

‘लक्षात ठेवा महाराज, छगन भुजबळाला मंत्रिपदाची पर्वा नाही’

“लक्षात ठेवा महाराज, छगन भुजबळाला मंत्रिपदाची पर्वा नाही, ना आमदारपदाची पर्वा नाही. तो गोरगरीबांसाठी लढेल. पण तुम्ही राज्याचे महाराज आहात ना? छत्रपती शाहूंच्या गादीवर तुम्ही बसता, तर महाराज सर्वांना न्याय द्या. अन्याय होणार नाही याची काळजी घ्या”, असं छगन भुजबळ संभाजीराजेंना उद्देशून म्हणाले.

महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.