महायुतीत शितयुद्धाची मालिका, पुण्यात दोन दादांमध्ये धुसफूसची चर्चा, आता नाशिकमध्ये दोन बड्या मंत्र्यांमध्ये कोल्डवॉर

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. असं असताना सत्ताधारी पक्षांमध्ये आता आपापसात धुसफूस सुरु असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

महायुतीत शितयुद्धाची मालिका, पुण्यात दोन दादांमध्ये धुसफूसची चर्चा, आता नाशिकमध्ये दोन बड्या मंत्र्यांमध्ये कोल्डवॉर
देवंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यात महाराष्ट्रातील गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रॅक्टर त्याचबरोबर प्रमुख महत्वाच्या प्रकल्पांमध्ये होणारी भविष्यातील गुंतवणूक याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 3:48 PM

नाशिक | 30 ऑगस्ट 2023 : राज्यात महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष, भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सत्तेत आहे. या तीनही पक्षांच्या महायुतीचं राज्यात सरकार आहे. पण या महायुतीत सध्या धुसफूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून काही ठिकाणी बड्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे. पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात शितयुद्ध सुरु असल्यासारखी परिस्थिती आहे.

अजित पवार यांच्याकडून परस्पर बैठकांचं सत्र सुरु असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या गोटात नाराजी असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पुण्यात धुसफूसची चर्चा सुरु असताना आता नाशिक जिल्ह्यात देखील धुसफूसच्या चर्चांना उधाण आलं आहे. नाशिकमध्ये खान्देशातील दोन बड्या मंत्र्यांमध्ये शितयुद्ध सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात हे शितयुद्ध कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाशिक जिल्ह्यात नेमकी चर्चा काय?

पालकमंत्री दादा भुसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात सध्या शितयुद्ध सुरु असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या चर्चांना निमित्त ठरत आहेत ते मंत्री गिरीश महाजन यांचे वाढते नाशिक दौरे. मधल्या काळात 15 ऑगस्टचं झेंडावंदन गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं आणि या चर्चांना सुरुवात झाली.

नाशिकमध्ये नेमकं काय सुरुय?

गिरीश महाजन दोन-तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आले होते. ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. लासलगाव मार्केट कमिटीमधील शेतकरी प्रतिनिधींना भेटले. त्यांची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक लावून देण्याचं आश्वासन दिलं. दुसरीकडे दादा भुसे यांनी देखील सातत्याने सर्व अधिकारी, नाफेडच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करुन हा विषय मार्गी लावण्याचंल आश्वासन दिलं. एका विषयावर, एकाच ठिकाणी दोन वेगळे नेते, वेगवेगळ्या बैठका घेत होते. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आलं.

भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

दादा भुसे यांनी नाशिकचं पालकमंत्रीपद घेतलं त्यावेळेला देखील गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. त्यानंतर आता गिरीश महाजन यांचे वाढते दौरे, नेमके काय संकेत देताय? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चांमुळे शिंदे गट आणि भाजप दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात दिसत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.