बांधकाम मजुरांना मोफत ‘मध्यान्ह भोजन’; नाशिकमधून सुरुवात, सकस आहार मिळणार
राज्यातल्या बांधकाम मुजरांना (construction workers) आता मोफत ‘मध्यान्ह भोजन’ (Free lunch) मिळणार असून, या योजनेची सुरुवात नाशिकमधून (Nashik) करण्यात आली.
नाशिकः राज्यातल्या बांधकाम मुजरांना (construction workers) आता मोफत ‘मध्यान्ह भोजन’ (Free lunch) मिळणार असून, या योजनेची सुरुवात नाशिकमधून (Nashik) करण्यात आली. (Free ‘lunch’ to construction workers; Starting from Nashik, you will get healthy food)
सध्या राज्यात 18 लाख 75 हजार 510 इतके नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. त्यातील 34 हजार 473 बांधकाम मजूर नाशिक जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडे नोंदणीकृत व पात्र बांधकाम कामगारांना मंडळाने जाहीर केलेल्या सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक व आर्थिक योजनेद्वारे विविध लाभ दिले जात आहे. त्यात अंतर्गतच शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मध्यान्ह भोजन योजनेचा’ शुभारंभ राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाला. उद्योग भवन, सातपूर एमआयडीसी येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय्, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, कामगार उपायुक्त विकास माळी, सहायक कामगार आयुक्त शर्वरी पोटे उपस्थित होते.
आहारात काय असणार?
राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावामुळे बांधकाम कामगारांची रात्रीच्या जेवणाची निकड विचारात घेऊन सद्यस्थित मध्यान्ह भोजन व रात्रीचे जेवण बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे. तसेच कोरोना काळआत मध्यान्ह भोजन सर्व बांधकाम कामगारांना मोफत देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये कामगारांना एका वेळेच्या जेवणात बाराशे कॅलरीज मिळतील इतका आहार देण्यात येणार आहे. या आहारात रोटी, दोन भाजी, डाळ, भात व इतर आहार समाविष्ट असणार आहे.
20,000 स्क्वे.फु. क्षेत्रामध्ये व्यवस्था
मोफत ‘मध्यान्ह भोजन’योजनेकरिता मंडळाने मे. इंडो अलाईड प्रोटीन प्रा. लि. मुंबई या कंपनीस काम दिलेले आहे. या कंपनीने (एमआयडीसी सातपूर) या ठिकणी 20,000/- स्क्वे.फु. क्षेत्रामध्ये सुसज्य व्यवस्था केली आहे. जेवण उत्कृष्ट दर्जाचे देण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर करून स्वयंपाक बनविण्यात येणार आहे. तसेच तयार झालेले जेवण अत्यंत पॅकबंद डब्यातून गरम राहण्यासाठी सुसज्य वाहनाद्वारे जिल्ह्यातील सर्व कामाच्या ठिकाणी पुरविले जाणार आहे.
नोंदणी नसलेल्या कामगारांनाही लाभ
नाशिक जिल्ह्यातील सर्व बांधकामाच्या साईटवर नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांना आणि नाका बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सदरचे मध्यान्ह भोजन सद्यस्थितीत मोफत असणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील नोंदीत व पात्र लाभार्थी बांधकामकामगारांना मागील 5 वर्षात सुमारे 35 कोटी रुपयाचे विविध योजनेतर्गत वाटप करण्यात आले आहे. (Free ‘lunch’ to construction workers; Starting from Nashik, you will get healthy food)
इतर बातम्याः
अलभ्य सुवर्णलाभ: होय, पुन्हा स्वस्त झाले; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!
रस्त्यावरच्या खड्ड्यात ‘राष्ट्रवादी’ने घातले श्राद्ध; नाशिकमध्ये महापालिकेच्या कारभाराचा अनोखा निषेध