नाशिकची जीवनवाहिणी असणारे गंगापूर धरण फुल्ल; आज दुपारी 12 पासून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू

नाशिकला (Nashik) पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur dam) शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज मंगळवारी (28 सप्टेंबर) दुपारी बारापासून पुन्हा एकदा धरणातून एकूण 3000 क्युसेक्सचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

नाशिकची जीवनवाहिणी असणारे गंगापूर धरण फुल्ल; आज दुपारी 12 पासून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण भरले आहे.
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 12:47 PM

नाशिकः नाशिकला (Nashik) पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur dam) शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज मंगळवारी (28 सप्टेंबर) दुपारी बारापासून पुन्हा एकदा धरणातून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली आहे. (Gangapur dam 100 percent full; The total discharge of 3000 cusecs started from 12 noon today)

नाशिकमध्ये पहाटे पावणेचारपासून पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी बाराच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रातही अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरण समूह भरत आला आहे. त्यातील गंगापूर धरण 100 टक्के भरले आहे. काश्यपी धरण 98 टक्के भरले आहे. गौतमी गोदावरी धरणही 100 टक्के भरले आहे, तर आळंदी धरण 99 टक्के भरले आहे. हवामान विभागाने आज दिवसभर जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे दुपारी बारापासून गंगापूर धरणातून पुन्हा एकदा एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईच्या प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार 28 सप्टेंबर रोजी विभागातील नाशिकसह काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांनी सावधानतेच्या अनुषंगाने नदी-नाले काठच्या परिसरातील लोकांनी सतर्क राहावे. नदी व धरण पात्रात कोणी उतरू नये. नागरिकांनी आपले पशुधन, वाहने सुरक्षित स्थळी ठेवावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे. दरम्यान, गुलाब चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपून काढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगावला रेड अलर्ट

हस्त नक्षत्राला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी सूर्याने हस्त नक्षात्रात प्रवेश केला. या नक्षत्राचा वाहन घोडा आहे. त्यामुळे खंडित स्वरूपाचा पाऊस होईल. यापूर्वीच्या उत्तरा नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने जोरदार पाऊस झाला, असा अंदाज दाते पंचांगामध्ये वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने जळगावला रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा आपत्ती विभागाच्या पथकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरी पेक्षा कमी पावासाची नोंद झाली. मात्र, सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे.

गंगापूर धरणातून आज दुपारी 12 वाजता एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग करण्यात येणार आहे. – सागर शिंदे, कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक. (Gangapur dam 100 percent full; The total discharge of 3000 cusecs started from 12 noon today)

इतर बातम्याः

कथित धर्मांतरण प्रकरणः नाशिकचा कुणाल उच्चशिक्षित, रशियात एम. डी. मेडिसीन केले पूर्ण; वडील होते लष्करी सेवेत

मतदार यादीतून नाशिकमध्ये 73 हजार नावे वगळली, पण तब्बल 2 लाख 87 हजार दुबार नावांचे काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.