नाशिकमध्ये सोन्याचे दर स्थिर, 10 ग्रॅममागे 47500; चांदी किलोमागे 66200 रुपयांवर

नाशिकमध्ये (Nashik) मंगळवारी (14 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 47500, तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 66200 रुपये नोंदवले गेले.

नाशिकमध्ये सोन्याचे दर स्थिर, 10 ग्रॅममागे 47500; चांदी किलोमागे 66200 रुपयांवर
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 4:05 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) मंगळवारी (14 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 47500, तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 66200 रुपये नोंदवले गेले. (Gold price stable in Nashik, 47500 per 10 grams; Silver at Rs 66,200 per kg)

नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सराफा बाजारातील दर स्थिर आहेत. मंगळवारी (114 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे दर 47500 होते. 22 कॅरेट सोन्याच्या दर 45000 रुपयांवर गेले होते. नाशिकमध्ये गुरुवारी चांदीचे किलोमागचे दर 65,800 होते. गुरुवारच्या तुलनेत शनिवारी चांदीच्या दरात तेराशे रुपयांची वाढ झाली होती. रविवारी हेच दर कायम होते. मात्र, मंगळवारी चांदीचे दर 66200 रुपयांवर स्थिरावले होते. सोने आणि चांदीच्या या दरावर अतिरिक्त जीएसटी असेल. दरम्यान, आता आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

सोने निचांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 2.1 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,787.40 डॉलर्सवर स्थिरावला होता. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला होता.

सोने आणि चांदीच्या भावात सध्या तरी मोठी पडझड किंवा चढउतार नाही. नाशिकच्या सराफा बाजार पेठेत मंगळवारी 47500 होते. 22 कॅरेट सोन्याचे दर 45000 रुपयांवर गेले. चांदीचे दर किलोमागे 66200 रुपये आहेत. – चेतन राजापूरकर, डायरेक्टर, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, महाराष्ट्र (Gold price stable in Nashik, 47500 per 10 grams; Silver at Rs 66,200 per kg)

इतर बातम्याः

लई भारीः नाशिकमध्ये चक्क सोन्याचे मोदक; दर 12000 रुपये किलो

नाशिक जिल्ह्यातील 12 धरणांतून विसर्ग; औरंगाबादला मोठा दिलासा, 8.14 टीएमसी पाणी जायकवाडीकडे

Nashikweather: नाशिक जिल्हा, खान्देशात पाऊस आजही जोरदार बॅटींग करण्याची शक्यता

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.