AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुवर्ण संधी: नाशिकमध्ये भाव स्वस्त; आता आपट्याची पानं नव्हे, तर शिलंगणाचं सोनं लुटा!

दसऱ्याची एक खूशखबर. अहो, अजूनही सोन्याचे दर स्वस्त आहेत. नाशिकच्या सराफा बाजारात आज शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47750 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46400 रुपये नोंदवले गेले.

सुवर्ण संधी: नाशिकमध्ये भाव स्वस्त; आता आपट्याची पानं नव्हे, तर शिलंगणाचं सोनं लुटा!
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 15, 2021 | 1:51 PM
Share

नाशिकः दसऱ्याची एक खूशखबर. अहो, अजूनही सोन्याचे दर स्वस्त आहेत. नाशिकच्या सराफा बाजारात आज शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47750 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46400 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 66000 रुपये नोंदवले गेले.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्यादिवशी शुक्रवारी नाशिकच्या सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसली. अनेकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी सोन्याचे बुकींग करून ठेवले होते. गुंतवणूक करणाऱ्यांनी पिवर सोने घ्यायला पसंदी दिली. नाशिक सराफा बाजारात गेल्या महिन्यापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी दरवाढ झालेली नाही. उलट दिवसेंदिवस सोने स्वस्त झालेले पाहायला मिळाले. 1 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात सोन्याच्या दरात किरकोळ चढउतार होताना दिसत आहे. शनिवारी चोवीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 47,000 रुपये, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 45,170 रुपये नोंदवले गेले. रविवारी आणि आज सोमवारीही हेच दर कायम होते. मंगळवारी यात किंचत वाढ होत चोवीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 47,800 रुपये, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 45,360 रुपये नोंदवले गेले. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 45360 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 61800 रुपये नोंदवले गेले. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47750 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46400 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 66000 रुपये नोंदवले गेले. दरम्यान, आता सराफा व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दिवाळी सणाकडे लागले आहेत. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.

एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे. सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्करावी लागणार नाही.

दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक. अनेक जण या दिवशी सोने खरेदीला प्राधान्य देतात. आमच्याकडे अनेकांनी बुकींग करून ठेवले होते. विशेषतः पिवर सोन्याला आज जास्त मागणी होती. भाव स्वस्त असल्याने शहरात आज मोठी उलाढाल होईल, अशी शक्यता आहे. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

हिंदू ही एकच जात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांचा लासलगावमध्ये दावा

Special report: घावली मुळमायेची मुळी, नारोशंकरांनी मागे पाहिले अन् माता गोदापात्रात थांबली; राजेबहाद्दरांच्या देवीची रोमहर्षक आख्यायिका!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.