तुमच्याकडे तरी मामी तयार आहे, पण आमचं कठिण आहे; गुलाबराव पाटील असं का म्हणाले?

विरोध करणं हे एकनाथ खडसे यांचं कामच आहे. त्यांनी विरोध केला नाही तर त्यांची बातमी टीव्हीवर येणार नाही, असा टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

तुमच्याकडे तरी मामी तयार आहे, पण आमचं कठिण आहे; गुलाबराव पाटील असं का म्हणाले?
gulabrao patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 7:48 AM

जळगाव | 30 सप्टेंबर 2023 : सत्तेत असलेल्या माणसांना कशाचीही भीती नसते. कारण कायदा त्यांच्या हातात असतो. निर्णय घेण्याची त्यांची ताकद असते. त्यामुळे ते म्हणतील ती पूर्वदिशा असते. म्हणूनच त्यांना कशाचीही भीती वाटत नाही. पण एखाद्या सत्ताधाऱ्याला त्यातही मंत्र्याला भीती वाटत असेल तर…? शिंदे सरकारमधील आक्रमक मंत्री गुलाबराव पाटील यांनाही सध्या एक भीती सतावते आहे. त्यांना एकाच गोष्टीची चिंता लागून राहिली आहे. ही चिंता त्यांनी जाहीरपणे व्यक्तही केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे ही चिंता त्यांच्या मित्रपक्षालाही टेन्शन देणारी आहे.

जळगावात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आळा होता. या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश भोळे मामाही उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही भीती बोलून दाखवली. महिलांच्या आरक्षणाच्या निर्णयामुळे आता जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण या मतदारसंघापैकी एका मतदारसंघात महिलांसाठी राखीव जागा निघणार आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्यास आमचं कठीण आहे, अशी भीती गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आमचं कठिण आहे

मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या मतदारसंघात महिलांसाठी राखीव आरक्षण निघणार? असा प्रश्न त्यांनी आमदार सुरेश भोळे यांच्यासमोर व्यक्त केला. मामा (सुरेश भोळे) मतदारसंघ राखीव झाला तर तुमच्याकडे तरी मामी तयार आहे. पण आमचं कठीण आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

माझंही भाकीत विचारायचंय

येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यावरून गुलाबराव पाटील यांनी राणा यांना चिमटे काढले. मलाही माझं भाकीत विचारायचं आहे. 2024 च्या निवडणुकीत माझं काय होईल? हे बाकी मला त्यांना विचारायचं आहे, असं उत्तर गुलाबराव पाटील यांनी आमदार रवी राणा यांनी केलेला खळबळ जनक दाव्यावर दिल आहे.

सखी वन स्टॉप सेंटर उभारणार

दरम्यान, जिल्हा महिला व बालविकास विभागाने जळगावातील महाबळ रस्त्यावरील जिल्हा ग्रंथालयाशेजारील जागेत केंद्रपुरस्कृत ‘सखी वन स्टॉप सेंटर’ ची इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या जागेचे भूमिपूजन व कोनशीला अनावरणगुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजनच्या 1 कोटी 16 लाख रूपये निधीतून ‘सखी वन स्टॉप सेंटर’ची इमारत उभारली जाणार आहे.

जिल्हा नियोजन मध्ये महिला व बालविकास योजनांसाठी 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. ‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या रूपाने महिलांना न्याय देणारे न्यायमंदिर उभे राहिल. या इमारतीचे मुदतीत आणि दर्जेदार कामे करावे, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.