छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सुरु केली, मित्राकडून चंद्रावरील जमीन नावावर करत बक्षीस, नाशिकच्या मित्रांची जोरदार चर्चा

छत्रपती शिवरायांची महाराष्ट्रात प्रथमच पालखी सुरू केली म्हणून मित्राने चंद्रावर (Land on Moon) एक एकर जमीन भेट दिल्याची घटना समोर आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सुरु केली, मित्राकडून चंद्रावरील जमीन नावावर करत बक्षीस, नाशिकच्या मित्रांची जोरदार चर्चा
moon
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 8:07 AM

शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी नाशिक : छत्रपती शिवरायांची महाराष्ट्रात प्रथमच पालखी सुरू केली म्हणून मित्राने चंद्रावर (Land on Moon) एक एकर जमीन भेट दिल्याची घटना समोर आली आहे. मैत्रीचे अनेक किस्से चित्रपटांपासून पुस्तकांपर्यंत सर्वत्र वाचायला, बघायला मिळतात. परंतु, इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील गोंदे दुमालामध्ये मैत्रीतील गोडव्याचे अनोखे उदाहरण नुकतेच ऐकायला मिळाले. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रूपेश हरिश्चंद्र नाठे (Raupesh Nathe) यांना वाढदिवसाला त्यांचे मित्र डॉ. हृषीकेश प्रदीप मुधळे व त्यांच्या परिवाराने थेट चंद्रावर एक एकर जमीन भेट स्वरुपात दिली आहे. जमीन खरेदीची कायदेशीर प्रक्रिया इंटरनॅशनल लुनार लॅण्ड्स अथॉरिटी यांच्याकडे राबविली आहे. यापूर्वी बॉलीवूडचे दिवंगत अभिनेते सुशांतसिंह राजपुत याने चंद्रावर जागा खरेदी केली होती. मित्राला थेट चंद्रावरील जमीन खरेदी करुन देण्याची ही घटना पहिलीच असावी, असं बोललं जात आहे.

चंद्रावरील जमीन देण्यामागचं नेमकं कारण काय?

वैद्यकीय शिक्षण घेत असलेले रूपेश नाठे यांनी गोंदे येथून महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती शिवरायांची पालखी सुरू केली. विविध सामाजिक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग बघून त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून त्यांचे मित्र डॉ. मुधळे व परिवाराने त्यांना ही अनोखी भेट दिली. रूपेश नाठे यांना थेट चंद्रावर एक एकर जमीन भेट स्वरुपात देण्यात आली.

मित्राला चंद्रावरील जमीन देण्याची पहिलीच घटना?

मित्राला वाढदिवसाला थेट चंद्रावर जमीन भेट दिल्याची बहुदा ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. एक एकर जमीन खरेदीची रितसर नोंद इंटरनॅशनल लुनार लॅण्ड्स अथॉरिटी येथे झाल्याचे नाठे यांनी सांगितले. या नोंदणीच्या कागदपत्रांसोबतच जागेचा नकाशा व बोर्डीग पासदेखील त्यांना देण्यात आला आहे.

सुशांतसिंह राजपूतनं यापूर्वी घेतलेली जमीन

बॉलिवूड अभिनेता सुशातसिंह राजपूत यानं यापूर्वी चंद्रावर जमीन खरेदी केली होती. नाशिकमधील मित्रानं मित्रासाठी दिलेल्या चंद्रावरील जमीनीच्या गिफ्टची चर्चा रंगली आहे.

इतर बातम्या:

Video | पंतप्रधान मोदी शिवाजी पार्कात आले! पवारांच्या बाजूला बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उठले आणि…

मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंचा संवाद, राज्यपालांची नजर खाली! नेमकी काय चर्चा?

Hrushikesh Thigale gave gift of land on Moon to Rupesh Nathe

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.