AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलभ्य सुवर्णलाभ: होय, पुन्हा स्वस्त झाले; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!

नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेत शुक्रवारी सोने (gold) पुन्हा स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46280 रुपये नोंदवले गेले.

अलभ्य सुवर्णलाभ: होय, पुन्हा स्वस्त झाले; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 5:45 PM

नाशिकः नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेत शुक्रवारी सोने (gold) पुन्हा स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46280 रुपये नोंदवले गेले. (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,280 per 10 grams)

सोन्या-चांदींच्या दागिन्यांचे भारतीयांना भारी आकर्षण. आता गुंतवणूक म्हणूनही तिकडे ओढा वाढतो आहे. इथल्या गुंतवणुकीचा परतावा खणखणीत वाजवून मिळतो. त्यामुळे बहुतांश जण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असतात. नाशिकच्या सराफा बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46600 रुपये नोंदवले गेले. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900 रुपये होते. या तुलनेत आजचे दर 46280 म्हणजेच जवळपास 620 रुपयांनी स्वस्त झालेले पाहायला मिळाले. 22 कॅरेट सोन्याचे दर गुरुवारी 45250 होते. हेच दर बुधवारी 10 ग्रॅममागे 45500 रुपये होते. या तुलनेत आजचे दर 45000 होते, म्हणजेच जवळपास 500 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी चांदीचे दर किलोमागे 61200 होते. विशेष म्हणजे बुधवारीही हेच दर कायम होते. शुक्रवारी या दरातही घसरण पहायला मिळाली असून, ते 60800 व स्थिरावले आहेत. सोन्या-चांदीच्या या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल. आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

किमती वाढण्याची शक्यता

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

असे ठेवा सोने साठवून

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

नाशिकच्या सराफा बाजार पेठेत आज 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 46280 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 45000 आहे. चांदीचे दर किलोमागे 60800 रुपये आहे. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, द नाशिक सराफा असोसिएशन (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,600 per 10 grams)

इतर बातम्याः

रस्त्यावरच्या खड्ड्यात ‘राष्ट्रवादी’ने घातले श्राद्ध; नाशिकमध्ये महापालिकेच्या कारभाराचा अनोखा निषेध

सराफा दुकानातून 15 तोळे सोन्यासह 6 हजारांची रोकड लंपास; नाशिकमध्ये आज सकाळी झालेल्या धाडसी चोरीने खळबळ

नाशिकमध्ये वाढत्या रुग्णांची चिंता, लसीकरणाचा वेग वाढवा; पालकमंत्री भुजबळांच्या प्रशासनाला सूचना

घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.