आरारारा खतरनाक; सोनं नॉनस्टॉप स्वस्त!

नाशिकच्या सराफा बाजारात मंगळवारी सोने पुन्हा स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46700 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45500 रुपये नोंदवले गेले.

आरारारा खतरनाक; सोनं नॉनस्टॉप स्वस्त!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 2:50 PM

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारात मंगळवारी (5 ऑक्टोबर) सोने पुन्हा स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46700 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45500 रुपये नोंदवले गेले.

सराफा बाजारात गेल्या महिन्यापासून सदाबहार सोने स्वस्तच आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45400 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 60600 रुपये नोंदवले गेले. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46700 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45500 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 61200 रुपये नोंदवले गेले. 30 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 47620 होते, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44480 होते. त्या तुलनेत सध्या तरी सोने स्वस्त झाले आहे. दरम्यान, आता सराफा व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दसरा सणाकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

साठवण्याची जोखीम संपली

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

नाशिकच्या सराफा बाजारात मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46700 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45500 रुपये नोंदवले गेले. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

नाशिक-मुंबई दोन तासांत; गडकरी म्हणतात टेप करून ठेवा, एकही आश्वासन खोटं होणार नाही, पाडला घोषणांचा पाऊस

कल्पकता आणि धाडस म्हणजे गडकरी, भुजबळांकडून कोडकौतुक; केंद्रीय मंत्री पवार म्हणाल्या विरोधकही संबोधतात ‘रोडकरी’

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.