राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर, संघटनात्मक बांधणींसदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता
राज ठाकरे हे 16, 17, 18 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात राज ठाकरे नाशिक महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे. राज ठाकरे हे 16, 17, 18 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात राज ठाकरे नाशिक महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करु नका, असं आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आहे. नाशिक महापालिकेत यापूर्वी मनसेची सत्ता होती. येत्या काळात नाशिक महापालिकेची निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे.
राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका, असं आवाहन राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलंय. राज ठाकरे नाशिकमधील मनसेच्या पक्ष बांधणी संदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीचा राज ठाकरेंचा नाशिक दौरा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरू शकतो.
संघटनात्मक मोठे निर्णय होण्याची शक्यता
नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता राहिली आहे. त्यावेळी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं केल्याचा दावा मनसेकडून केला जातोय. मात्र, असं असलं तरी नाशिककरांनी मनसेला दुसऱ्यावेळी नाकारल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा रोवण्यासाठी राज ठाकरे सरसावले असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या 3 दिवसांच्या दौऱ्यात राज ठाकरे संघटनात्मक मोठे निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज ठाकरे यांचा नाशिक दौरा होत असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
पुणे महापालिकेत ‘एकला चलो रे’?
राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीत मनसे ‘एकला चलो रे’ असणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी फार बोलण्याचे टाळले. त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मोघम वक्तव्य त्यांनी केले. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला.
इतर बातम्या:
8 ते 10 जिल्ह्यात अजूनही संसर्ग, 3 कोटी जादा डोस द्या, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी
सरकारचा SEBC उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय संपूर्णपणे ‘फसवा’, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
MNS President Raj Thackeray on three days visit to Nashik to take reviews of mns preparations over Nashik Municipal Corporation elections