Muktibhoomi Yeola | मुक्तीभूमी येवल्यात 15 कोटींची कामे होणार; बाबासाहेबांच्या जयंतीदिनी फुटला नारळ

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही सर्वोत्तम आहे. मात्र ज्यांच्या हातात सत्ता जाईल ते या घटनेचा वापर कसा करतील त्यावर तिचे श्रेष्ठत्व ठरणार आहे. एकाला एक आणि एकाला एक न्याय दिला तर लोकशाही टिकणार नाही. या राज्यघटनेला हात लावणे तर दूर याकडे वाकडे बघण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये.

Muktibhoomi Yeola | मुक्तीभूमी येवल्यात 15 कोटींची कामे होणार; बाबासाहेबांच्या जयंतीदिनी फुटला नारळ
छगन भुजबळांच्या हस्ते येवला येथे विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 3:18 PM

येवलाः नाशिक (Nashik) जिल्ह्यातली मुक्तीभूमी (Muktibhoomi) येवला येथील स्मारकात तब्बल 15 कोटींची कामे होणार आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते या विविध विकासकामांचे भूमिपूजन कर्यात आले. या स्मारक परिसरात प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय-वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, अतिथी निवासस्थानासह इतर सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमाला आमदार नरेंद्र दराडे, माजी खासदार समीर भुजबळ,भन्ते भारद्वाज, प्रांतअधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार प्रमोद हिले, प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील, उपअभियंता उमेश पाटील, बार्टीच्या व्यवस्थापक पल्लवी पगारे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे आदी उपस्थित होते.

कोणती कामे होणार?

फेज 2 अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक येवला या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्याकडून या स्थळाचा विकास करण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळालेली आहे. या अंतर्गत प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, संरक्षण भिंत, अॅम्पीथिएटर, लॅण्डस्केपिंग, अतिथिगृह आदी विकास कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये तळमजल्यावर 12 भिक्कू निवासस्थानांचे बांधकाम, प्रशासकीय कार्यालय, कॅन्टीन, किचन, महिला पुरुष प्रसाधन गृह बांधण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर 3 भिक्कू पाठशाला, प्रत्येकी १ मिटिंग हॉल, पाली व संस्कृत संशोधन केंद्र, ग्रंथालय, आर्ट गॅलरी, दृक्षश्राव्य कक्ष, महिला व प्रसाधन गृह बांधण्यात येणार आहे. दुसऱ्या मजल्यावर एकूण 6 बौद्ध भिक्कू विपश्यना केंद्रासाठी बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच 300 लोक क्षमतेचे अॅम्पीथिअटर बांधकाम, स्टेजचे बांधकाम, 1 व्हीआयपी कक्षाचे बांधकाम, 2 ग्रीन रूमचे बांधकाम, 1 स्टोअरचे बांधकाम करण्यात येणार असून वर्ग 3 कर्मचाऱ्याकरिता 1 निवासस्थान, वर्ग 4 कर्मचाऱ्याकरिता 3 निवासस्थान, सिक्युरिटी केबिन, संरक्षण भिंत, अंतर्गत मार्ग, वाहनतळ व बागबगीचा विकसित करण्यात येणार आहे.

13 कोटींचा विश्वभूषण स्तुप…

भुजबळ म्हणाले की, या जागेचे महत्त्व लक्षात घेवून, सदरील जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पहिल्या टप्प्यात विश्वभूषण स्तुपाचे 13 कोटी किमतीचे बांधकाम पूर्ण झालेले. फेज 1 अंतर्गत येवला येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक मुक्तीभूमीचा विकास करून याठिकाणी ठिकाणी भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात आलेले आहे. पुढील टप्प्यातील मुक्तीभूमीच्या विकासाची कामे अतिशय दर्जेदार होईल यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्यात यावे.

बाबासाहेब हे विश्वरत्न…

कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, जगभरातील देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्य घटनेचा अभ्यास करून त्यांच्या देशाची घटना तयार करतात. जगभरात केवळ धर्माच्या नावाने निर्माण झालेल्या राष्ट्रात कायमच उलथापालथ होत आहे. मात्र, भारतासारख्या खंडप्राय देशाला एकत्रित ठेवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने केलेले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न आहेत. केवळ आपल्या देशावरच नाही तर त्यांचे जगावर उपकार आहेत.

धर्माधर्मात वाद लावण्याचा प्रयत्न…

भुजबळ म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही सर्वोत्तम आहे. मात्र ज्यांच्या हातात सत्ता जाईल ते या घटनेचा वापर कसा करतील त्यावर तिचे श्रेष्ठत्व ठरणार आहे. एकाला एक आणि एकाला एक न्याय दिला तर लोकशाही टिकणार नाही. या राज्यघटनेला हात लावणे तर दूर याकडे वाकडे बघण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये. धर्माधर्मात वाद लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. द्वेष पसरविला जात आहे. लोकशाही व्यवस्थेला हे घातक असल्याचे त्यांनी सांगितले. अंधश्रद्धेचा पगडा घालण्याचा लोक काही आपमतलबी लोक करत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांचा बळी जातो आहे. अन्यायाच्या विरुद्ध हा लढा लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला प्रेरणा देतात. त्यामुळे हेच आपले आदर्श आहेत. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.