नाशिकः नांदगाव, साकुरीत पुन्हा पूर; वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. नांदगावमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून लेंडी नदीला पूर आला आहे. दुसरीकडे साकुरीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने अख्खे गाव जलमय झाले आहे.

नाशिकः नांदगाव, साकुरीत पुन्हा पूर; वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले
नांदगावमध्ये पुरात वाहून जाणाऱ्या तरुणास वाचविण्यात आले.
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 11:00 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. नांदगावमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून लेंडी नदीला पूर आला आहे. दुसरीकडे साकुरीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने अख्खे गाव जलमय झाले आहे. (Nandgaon, Sakuri flooded again; Rescued a young man who was swept away in a river)

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावणे सुरू केले आहे. मंगळवारी नाशिक शहरात दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मात्र, रात्री नऊच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी पहाटे साडेचारपासून पाऊस सुरू होता. सकाळी सातनंतर पावसाचा जोर वाढला. अर्धा तास जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने सगळीकडे पाणीपाणी केले. दरम्यान, मंगळवारी नांदगावलाही पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेल्या आडव्यातिडव्या पावसाने शहराला झोडपून काढले. त्यामुळे लेंडी नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. या पाण्यातून येताना अरुण साळवे हा तरुण वाहून जात होता. त्यावेळी त्याने आरडाओरडा सुरू केला. तेव्हा इतर नागरिकांनी पुराच्या पाण्यात उडी घेत आणि मानवी साखळी करून अरुणचा जीव वाचवला.

गाव पाण्यात 

मालेगाव तालुक्यातल्या साकोरीला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपले. अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. सगळ्या गावात पाणी शिरले होते. स्मशानभूमी, शाळा, रस्ते, घरांतसुद्धा पाणी शिरले. गावाजळच्या नदीला पूर आला. यापूर्वी गेल्या आठवड्यातही साकोरीमध्ये असाच पाऊस झाला होता. या पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले. मात्र, कसलिही दुर्घटना घडली नाही. पाऊस वाढला असता, तर गावकऱ्यांवर मोठे संकट ओढावले असते.

पिकाचे नुकसान

नांदगाव आणि साकोरीमध्ये यापूर्वीही असाच पाऊस झाला होता. आता पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेल्यात जमा आहे. सध्या खरीप हंगाम सुरू आहेत. दसरा, दिवाळीचे सण तोंडावर आले आहेत. खरिपाचे पीक आले, तर हातात चांगला पैसा खुळखुळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, या आशेवर पावसाने सध्या तरी पाणी फिरले आहे. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (Nandgaon, Sakuri flooded again; Rescued a young man who was swept away in a river)

इतर बातम्याः

चर्चा तर होणारचः राज ठाकरे आज नाशिकमध्ये; पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत

कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यास मागता येईल दाद; पोलिसांविरुद्धच्या तक्रारीसाठी नाशिकमध्ये प्राधिकरण

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.