Nashik | गंगापूर धरणातून 3486 तर दारणामधून 7244 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू, धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच!
पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर आणि दारणासह इतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलायं. गंगापूर धरणातून 3486 तर दारणामधून 7244 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुतोंडया मारुतीच्या कमरेखाली सध्या पाणी आहे. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिर अद्यापही पाण्याखालीच बघायला मिळतायंत.
नाशिक : नाशिकच्या (Nashik) धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून सध्या 3400 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी पुन्हा वाढायला सुरुवात झालीयं. पावसाचा (Rain) जोर कायम राहिल्यास यंदाच्या मोसमात चौथा पूर गोदावरीला येऊ शकतो. यामुळे गोदावरी परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देखील देण्यात आलायं. यामुळे नद्यांना पूर (Rivers flood) येण्याची देखील शक्यता आहे. धरणक्षेत्रात पुन्हा संततधार पाऊस सुरू झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढू शकतो.
पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर आणि दारणासह इतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलायं. गंगापूर धरणातून 3486 तर दारणामधून 7244 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुतोंडया मारुतीच्या कमरेखाली सध्या पाणी आहे. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिर अद्यापही पाण्याखालीच बघायला मिळतायंत. गोदावरी आणि दारणा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलायं.
गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे नाशिक जिल्हातील धरणे ओव्हर फ्लो
गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे नाशिक जिल्हातील धरणे ओव्हर फ्लो झाली असून यंदाच्या वर्षीच्या पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. जून महिन्यात नाशिक जिल्हात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता, यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट होते. परंतू जुलै महिन्यात जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. गंगापूर धरणातून 3486 तर दारणामधून 7244 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर देखील आलायं. इतकेच नाही तर गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली आहेत.