Nashik Corona|नाशिकमध्ये किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा धडाका; तर वाढत्या संसर्गाने पुन्हा धडकी

नाशिकमधील पंचवटी येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालयातील 27 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झालीय. त्यांच्या संपर्कातील 200 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेत.

Nashik Corona|नाशिकमध्ये किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा धडाका; तर वाढत्या संसर्गाने पुन्हा धडकी
vaccination
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 9:34 AM

नाशिकः नाशिकमध्ये किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी शहरातील 6 केंद्रांवर 15 ते 18 वयोगटातील 1325 मुलांनी लस घेतल्याचे समोर आले. यात 833 मुले आणि 492 मुलांचा समावेश आहे. यांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस दिले जात आहेत. दुसरा डोस 28 दिवसांनी देण्यात येणारय. मुलांच्या लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आलीय. त्यांच्यासाठी प्रत्येक केंद्रावर 100 डोस राखीव ठेवण्यात येतायत.

असे झाले लसीकरण

सातपूरमधील ईएसआय रुग्णालयात 500 मुलांचे लसीकरण झाले. मेरी कोविड सेंटर येथे 365, नाशिक-पुणे रोडवरील समाजकल्याण सेंटर येथे 125, सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात 130 डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 150 मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पालकांनी किशोरवयीन मुलांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. नाव नोंदणी करावी. लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

27 विद्यार्थिनी बाधित

नाशिकमधील पंचवटी येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे दंत महाविद्यालयातील 27 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झालीय. त्यांच्या संपर्कातील 200 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेत. शिवाय वसतिगृहाचे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी इगतपुरील्या मुंढेगाव आश्रमशाळेतील 15 विद्यार्थी बाधित आढळले होते, तर चांदशी येथील खासगी शाळेत एक विद्यार्थी ओमिक्रॉन बाधित आढळला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

नाशिक जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात सगळीकडे कोरोना निर्बंधाचे होणारे सर्रास उल्लंघन. विशेषतः राजकीय पक्षाचे नेते आणि त्यांच्या जाहीर कार्यक्रमात नियमांना दिलेली तिलांजली. हेच पालन इतर ठिकाणीही होताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 691 वर पोहचली आहे. त्यात एकट्या नाशिक महापालिका क्षेत्रातील तब्बल 438 रुग्ण आहेत.

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

नाशिकमध्ये कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. ऑक्सजिनसाठी लोकांनी रस्त्यावर अक्षरशः रांगा लावल्या होत्या. याचे भयावह चित्र मीडियातून पुढे आले होते. हे पाहता आता महापालिकेने ऑक्सिजनची चोख व्यवस्था केली आहे. दररोज 4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत. त्यातून 23 मेट्रीक टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजनसाठी 246 मेट्रीक टन क्षमतेच्या 19 टाक्या आहेत. 130 मेट्रीक टन साठ्याचे 7271 ऑक्सिजन सिलिंडरही तयार ठेवण्यात आले आहेत.

इतर बातम्याः

Nashik|नाशिकमध्ये सैनिकी वसतिगृहात नोकरभरती; कधीपर्यंत, कसा करावा अर्ज?

Nashik| दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी 12 डिसेंबरपासून जिल्ह्यात विशेष मोहीम; असा घेता येईल लाभ…

Nashik Corona| कोरोना लस घेतल्याशिवाय सप्तश्रृंगीचे दर्शन नाही; इतरही नियम कडक, जरूर जाणून घ्या…!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.