नाशिक कोरोनाः 846 रुग्णांवर उपचार सुरू; सिन्नर, निफाड पुन्हा हॉटस्पॉट

नाशिक (Nashik) जिल्ह्यात सध्या 846 कोरोना ( Corona) रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे. मात्र, सिन्नर आणि निफाड पुन्हा हॉटस्पॉट ठरत आहेत. सिन्नर येथे सध्या 160, तर निफाड येते 137 रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

नाशिक कोरोनाः 846 रुग्णांवर उपचार सुरू; सिन्नर, निफाड पुन्हा हॉटस्पॉट
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 5:33 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात सध्या 846 कोरोना ( Corona) रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या आणि गर्दीच्या दिवसाच्या काळातही शहरवासीयांना दिलासा (Nashik Helth) मिळाला आहे. मात्र, सिन्नर आणि निफाड पुन्हा हॉटस्पॉट ठरत आहेत. सिन्नर येथे सध्या 160, तर निफाड येते 137 रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. (Nashik Corona: 846 patients are undergoing treatment, recovery rate is 97.68 percent, Sinnar, Niphad hotspot)

जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमधून 4 हजार 146, नाशिक महापालिका क्षेत्रातून 3 हजार 976, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातून 357 आणि जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.96 टक्के, नाशिक शहरात 98.14 टक्के, मालेगावमध्ये 97.10 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.60 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के इतके आहे.

येथे आहेत पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 41, बागलाण 13, चांदवड 35, देवळा 19, दिंडोरी 17, इगतपुरी 7, कळवण 8, मालेगाव 12, नांदगाव 12, निफाड 137, पेठ 1, सिन्नर 160, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 5, येवला 44 अशा एकूण 513 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात 303, मालेगाव महापालिका क्षेत्रात 15 तर जिल्ह्याबाहेरील 15 रुग्ण असून, एकूण 846 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 6 हजार 775 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 3, बागलाण 1, चांदवड 2, दिंडोरी 1, मालेगाव 1, निफाड १७,सिन्नर २५, येवला 2 असे एकूण 52 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

शाळा उघडण्याची प्रतीक्षा

नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडतच आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. ज्या गावांमध्ये एक महिन्यापर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही, त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र, जिल्ह्यात तूर्तास तरी अशी स्थिती असल्याचे दिसत नाही.

लसीकरण वेगात

नागरिकांची जागरुकता आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारा लससाठा यामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कोरोना (corona) लसीकरणाचा (vaccine) वारू चौखुर उधळून डोसचा आकडा हा तब्बल 25 लाखांच्या घरात गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 24 लाख 74 हजार 722 जणांनी लस घेतली आहे. यातील लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 18 लाख 31 हजार 204 आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 6 लाख 43 हजार 518 आहे.

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे. आत्तापर्यंत 8 हजार 605 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. – डॉ. अनंतर पवार, जिल्हा नोडल अधिकारी (Nashik Corona: 846 patients are undergoing treatment, recovery rate is 97.68 percent, Sinnar, Niphad hotspot)

इतर बातम्याः

मातीमोलः नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला किलोमागे फक्त 1 रुपयाचा भाव

लई भारीः नाशिकमध्ये चक्क सोन्याचे मोदक; दर 12000 रुपये किलो

नाशिक जिल्ह्यातील 12 धरणांतून विसर्ग; औरंगाबादला मोठा दिलासा, 8.14 टीएमसी पाणी जायकवाडीकडे

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.