Malegaon Rain | आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर मालेगाव शहर परिसरात पावसाचे जोरदार आगमन!
मालेगावात झालेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत. रस्त्याच्याकडेला असलेल्या काही दुकानात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले. दमदार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले असले तरी मात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मालेगाव : गेल्या एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर मालेगाव (Malegaon) शहर परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाले. एक तास मुसळधार पावसाने शहर परिसराला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. गेल्या काही दिवसांपासुन राज्यात सर्वदूर जोरदार पावसाच्या (Rain) सरी बरसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्याही करून घेतल्या आहेत. विशेष म्हणजे पावसाच्या आगमनामुळे पाणीटंचाईचे संकट दूर झाले असून बोरला पाणी (Water) देखील येत असल्याने नागरिकांची मोठी चिंता दूर झालीयं.
मालेगावात जोरदार पावसाची हजेरी
मालेगावात झालेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागली. रस्त्याच्याकडेला असलेल्या काही दुकानात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले. दमदार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले असले तरी मात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांमध्ये पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होतेच, शिवाय दुबार पेरणीचेही संकट होते. मात्र, काल झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदानच मिळाले आहे.
पाणीटंचाईची समस्या टळली
यंदा राज्यात 4 जूनला मान्सून दाखल होणार होता. मात्र, मान्सून सक्रिय होण्यास तब्बल जुलै महिना उजाडला आहे. यामुळे राज्यातील अनेक धरणातील पाणी साठा कमी झाला. यामुळे अनेक शहरांमध्ये पाणीकपातीचे संकट होते. मुंबईमध्ये 10 टक्के पाणी कपीत करण्याच्या निर्णय महापालिकेने घेतला होता. तसेच नाशिकच्या अनेक भागांमध्ये तर टॅकरने पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू होते. आता पावसाच्या दमदार हजेरीने पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे.